करमाळा

करमाळयात आज गुरुवारी आणखी ३ रुग्ण वाढले; दिवस भरात ५ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण १६

करमाळयात आज गुरुवारी आणखी ३ रुग्ण वाढले; दिवस भरात ५ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण १६

करमाळा माढा न्यूज; करमाळा येथे आज प्रथमच रॅपिड एंटीजन टेस्ट नुसार 26 जणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत नुसार नव्या 3 बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. आज सकाळी आलेल्या अहवालानुसार २ रुग्ण वाढले होते व हे ३ नवे रुग्ण असे आज दिवसभरात आतापर्यंत एकूण ५ नवे कोरोनाबाधित करमाळयात झाले आहेत.

आता करमाळयातील रुग्णांची एकूण संख्या १६ झाली आहे. या १६ व्यतिरिक्त १ रुग्ण सोलापूर शहरातून करमाळयात आला होता तर १ झरेचा ठाणे हून आलेला त्यास सोलापूरला पाठवले होते. अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

सोलापूरला स्वाब पाठविणे व मग त्यांचे अहवाल येणे यात प्रचंड वेळ जात आहे. पण आता करमाळ्यातच रॅपिड एंटीजन टेस्ट ची उपलब्धता झाल्यानंतर आज पहिल्यांदाच 26 जणांना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तीन जण बाधित आढळल्याची प्राथमिक माहिती आहे.

___________________________________________

सुपरफास्ट बातम्या मिळवण्यासाठी ‘करमाळा माढा न्यूजची’ बातमी उघडल्यानंतर खाली दिसणाऱ्या बेल आयकॉन अथवा – ALLOW बटनावर क्लिक करा,
आणि मिळवा प्रत्येक बातमी थेट मोबाईलवर.
जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 70 58 59 29 90 
———————————————————————ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9067564080 हा नंबर तुमच्या ग्रुपला ऍड करा. किंवा वैयक्तिक लिहा “Karmala Madha News”

litsbros

Comment here