करमाळा

करमाळा बायपास चौकातील बिनकामाचा व अडथळा ठरणारा अर्धवट उड्डाणपूल त्वरित पाडण्याची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा बायपास चौकातील बिनकामाचा व अडथळा ठरणारा अर्धवट उड्डाणपूल त्वरित पाडा

करमाळा(प्रतिनिधी) ; गेल्या 10 वर्षापासून टेंभुर्णी – अहमदनगर रस्त्याचे काम सुरू असताना करमाळा बायपास चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू केले होते. परंतु गेल्या 10 वर्षापासून या रस्त्याचे काम बंद असल्यामुळे हा उड्डाणपूल देखील अर्धवट अवस्थेत तसाच आहे.

या उड्डाणपुलामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.या पुलाच्या बाजूने रस्त्याला खड्डे पडले आहे.या पुलामुळे बरेच वाहनधारक या विरुद्ध दिशेने गाडी चालवून चौक ओलांडण्याचा प्रयत्न करतात.

आतापर्यंत या परिसरात बऱ्याच वेळा लहान अपघात झाले आहेत परंतु यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.

यामुळे हा उड्डाणपूल त्वरित पाडवा अशी मागणी अशोक गोफणे तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा यांनी केली आहे.

litsbros

Comment here