करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

ब्रेकिंग; ट्रक-मोटारसायकल धडकेत करमाळा तालुक्यातील कुंभेज येथील तरुण ठार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ब्रेकिंग; ट्रक-मोटारसायकल धडकेत करमाळा तालुक्यातील कुंभेज येथील तरुण ठार

करमाळा(प्रतिनिधी) ; आज सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगर-टेंभुर्णी हायवेवर खडकेवाडी फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला असून या अपघातात मोटारसायकल वरील तरुण ठार झाला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, खडकेवाडी फाट्याजवळ ट्रक व मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. यावेळी नितीन पवळ हे करमाळया कडून कुंभेजकडे जात होते. परंतु या गंभीर अपघातात नितीन पोपट पवळ(वय 37, गाव – कुंभेज) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर कुंभेज याना करमाळा येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. या घटनेनंतर कुंभेज गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात कसा झाला या बाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

litsbros

Comment here