करमाळामनोरंजनसोलापूर जिल्हा

करमाळयाचे प्रसिद्ध पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांचे आई कमलाभवानी चे जबरदस्त गीत मान्यवरांच्या हस्ते लॉन्च; नवरात्रीत गाजणारं गाणं

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयाचे प्रसिद्ध पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांचे आई कमलाभवानी चे जबरदस्त गीत मान्यवरांच्या हस्ते लॉन्च; नवरात्रीत गाजणारं गाणं

करमाळा(प्रतिनिधी) ; तालुक्यातील मांगी गावचे पार्शवगायक प्रविणकुमार अवचर यांनी करमाळा येथीलकमला देवी ,च महिमा सांगणारे खूप सुंदर असे गीत तयार केले हे गीत त्यांनि स्वतः लिहुन या गीताच संगीत स्वतः तयार करून
मोठ्या स्टुडिओ ला मोठया वादकांकडून या गीताचा रिथम तयार करून हे गीत रेकॉर्ड केले.

हे गीत गायक प्रावीमकुमार व त्यांचे सहगायक यानि सुरेल आवाजात सादर केले त्यामुळ गाणं सूरु होताच एकनारे श्रोते ठेका धरतात. आई कमलादेवीचे अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले गेले आहे. गीताची शब्दरचना ही अतिशय अभ्यास पूर्ण अशी केली असून यामध्ये श्री कमला देवी ट्रस्ट चे पुजारी दादा पुजारी अशोक घाटे ,विशाल राठोड आणि जेष्ठ नारायण पुजारी यांनी महत्वाचे सहकार्य केले आहे.

त्यामुळे एक दर्जेदार असे गीत कमलाई भक्तांना व करमाळा करा ना ऐकायला मिळते आहे,
यानिमित्त करमाळा येथील नगराध्यक्ष श्री वैभवराजे जगताप , मंदिर ट्रस्टी राजू सेठ परदेशी सौ मधुरी परदेशी,सौ भावना गांधी श्री घोडके ,शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण कटारिया ,नेते संजय शिंदे,विशाल शेठ राठोड , यांचे हस्ते गाण्यावरती क्लिक करून लॉंचिंग करण्यात आले.

या प्रसंगी ,मार्केट कमिटी चे विठ्ठल क्षीरसागर , भाजप व्यापारी संघाचे जितेश कटारिया ,माजी नगराध्यक्ष प्रशांत डहाळे , सुजित तात्या बागल पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती ,संतोष (दादा) कांबळे ,निखिल सोरटे ,सरपंच बाळासाहेब , सोरटे,श्री ,थोरबोले , कोळगाव ग्रामपंचायत सदस्य अमित भाऊ जागते,

ट्रस्ट पुजारी नारायण सोरटे,अशोक गाठे सिकंदर अण्णा जाधव ,मांगी येथिल पैलवान पप्पू शिंदे वस्ताद ,सचिन अब्दुले सर,पत्रकार श्री महेश चिवटे, सुहास घोलप ,श्री सचिन जव्हेरी कुमार खाटेर बंधू , प्रसिद्ध दोस्तीबेंजो मालक अलीम भाई कुरेशी ,नासिरभाई कुरेशी ,
करमाळा येथील गायक पत्रकार
प्रफुल्लकुमार दामोदरे , उपस्तिथ होते.

यावेळी मकाई कारखान्याचे चेअरमन श्री दिग्विजय बागल ,व करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन नगरसेवक श्री कन्हैयाला देवी हे बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी आवर्जून फोन वरती शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा- दारफळ सीना ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारा विरोधात शेतकऱ्याचे सहकुटुंब आमरण उपोषण

आता करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात मिळणार डिझेल; सालसे येथे झाले फिरत्या डिझेल पंपाचे उद्घाटन

प्रविणकुमार अवचर यांनी आई कमलाईच खूप दर्जेदार असे गीत बनवून नवरात्री ची गाण्याचे रूपातून जी भेट दिलीय त्यामुळे आपल्या कमला भवानी चे गीत प्रत्येक घराघरात वाजायला हवं तसेच हे गीत तालुक्यातच नाही तर देशात व परदेशात ही आपण पोहोचवणार आहोत.

 – वैभवराजे जगताप, लोकनियुक्त नगराध्यक्ष करमाळा

करमाळा तालुक्यातून व शहरातून अनेक कलाकार घडले मात्र अजपर्यंत कोणीही ,कमला देवी चे गीत बनवले नव्हते , परंतु पार्शवगायक प्रविणकुमार अवचर यांनी पहिलेच दर्जेदार आणि खूप सुंदर असे कामलादेवी चे गाणे बवणुन भक्तांना व रसिकांना एक नवरात्रीची गाण्याची भेट दिली त्याबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्या ,यावेळी सर्व मान्यवरांनी मान्यवरांनी शुभेच्छा चा वर्षाव केला.

संजय शिंदे, नेते

litsbros

Comment here