करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा भाजपाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा भाजपाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा येथे योग दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने करमाळा येथील कन्या विद्यालयात पतंजली योग समितीचे हनुमानसिंग परदेशी यांनी योगाचे प्रात्यक्षिक सकाळी ७ ते ८ या वेळेत करून घेतले. त्यांच्यासोबत पतंजली योग समितीचे शिक्षक राजूकाका वाशिंबेकर, रामचंद्र कदम, पंडित गुरुजी, प्रदीप वीर व आशिष सोनी उपस्थित होते.


संपूर्ण भारतात २१ जून म्हणजेच आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. योगासने ही आपल्या देशातील एक प्राचीन काळापासून चालत आलेली विद्या आहे.या विद्येचा प्रसार होवून जगभरातल्या लोकांचे आरोग्य सुधरावे याकरिता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी योगासनांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यास प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांनी योग स्वीकारला आणि आरोग्यमय जीवन जगू लागले आहेत. त्यामुळे योगाचे जीवनात अनन्या साधारण असे महत्व आहे.

या योग कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल , ज्येष्ठ नेते राधेश्याम देवी, जिल्हा चिटणीस विनोद महानवर, तालुका सरचिटणीस आजिनाथ सुरवसे, सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब कुंभार, दिनेश मडके, जयंत काळे पाटील, सोमनाथ घाडगे , गणेश महाडिक, प्रविण बिनवडे, भीष्माचार्य चांदणे सर ,पूजा माने , किरण शिंदे, सचिन कानगुडे, लखन शिंदे,

हेही वाचा – जेऊर-चिखलठाण रस्त्याची दुरावस्था, तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन करू; शंभूराजे जगताप यांचा इशारा

‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

शंभुनाथ मेरुकर, शैलेश राजमाने ,गणेश वाशिंबेकर, प्रसाद गेंड, कपिल मंडलिक, अक्षय बोकण , किरण हाके, नंदकुमार कोरपे ,प्रवीण शेळके, भूषण पाटील,विनोद इंदलकर ,महादेव गोसावी, संतोष जवकर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

litsbros