मनोरंजनराष्ट्रीय घडामोडी

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार.. यांच्या निधनानंतर कर्नाटकात हायअलर्ट जारी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार.. यांच्या निधनानंतर कर्नाटकात हायअलर्ट जारी

२६ अनाथाश्रम,
२५ शाळा
१६ वृद्धाश्रम
१९ गोशाळा
१८०० विद्यार्थी शिक्षण
विविध शिक्षण संस्थांना वेळाेवेळी मदत
आणि म्हैसूरमध्ये शक्तीधामा नावाची मोठी संस्था… जिथे मुलींची काळजी घेतली जाते.


स्वतः गायलेल्या गाण्यांचं मानधन थेट विविध सामाजिक संस्थांना समर्पित करणारे,
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार… रियल पॉवर स्टार…
एवढ्या माेठ्या सामाजिक कार्याचा , सर्वांसमाेर नवा आदर्श ठेवलात . तुम्ही नेहमीच आठवणींत रहाल
भावपूर्ण श्रध्दांजली.


——————————————–
◼️पुनीत राजकुमार यांची माहिती

पुनीत राजकुमार हा कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे.

त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.

तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा – राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्या टोळीला अटक;सोलापूर ग्रामीण एलसीबीची धडाकेबाज कामगिरी

वाशिंबे ते भाळवणी दुहेरी रेल्वे लाईनची चाचणी यशस्वी; गाडीला जास्तीत जास्त ‘इतका’ स्पीड

पुनीत हे २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अप्पू या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. त्याने आतापर्यंत कन्नडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र या चित्रपटात काम केले आहे.

litsbros

Comment here