करमाळाजेऊरशैक्षणिक

जेऊर येथील जीनियस प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस चे घवघवीत यश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथील जीनियस प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस चे घवघवीत यश

करमाळा(प्रतिनिधी) ; प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर स्पर्धा 2021 ऑनलाईन पद्धतीने दिनांक 28 जुलै 2019 रोजी घेण्यात आली. ही परीक्षा जागतिक लेव्हलची असल्यामुळे या परीक्षेत भारत इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान इंडोनेशिया आणि कॅनडा या देशातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

भारतातील 16 राज्यातील सुमारे 4000 विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन परीक्षेत सहभाग नोंदवला. जेऊर येथील जीनियस प्रोऍक्टिव्ह अबॅकस च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत देदीप्यमान असे यश मिळवले आहे.

या स्पर्धेमध्ये जीनियस प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस जेऊर मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी विविध गटात पारितोषिके पटकावली आहेत. 6 मिनिटांमध्ये 100 गणिते सोडवण्याचा आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये लिटिल चॅम्प लेवल A गटामध्ये स्वरा निर्मळ 1st rank , अनुष्का जाधव आणि आयुष जाधव 2nd rank , पलक बलडोटा 3rd rank, गिरिषा मुथा आणि सई नलवडे 4th rank तसेच लेव्हल B मध्ये सृजन घाडगे 1st rank, आदिती कानगुडे 2nd rank, नंदिनी कानगुडे 3rd rank,

तन्मय सरडे आणि शौनक दुधाळ 4th rank लेवल C मध्ये साक्षी माळवे 1st rank मधुरा डांगे 2nd rank, रिधा फकीर 3rd rank तसेच लेवल D मध्ये नमन दोशी 1st rank ,वेदांती निमगिरे 2nd rank, रिहान शेख 3rd rank लेवल E मध्ये मुग्धा डांगे 1st rank निऋत्ती हेळकर 2nd rank, अतिथी मुंगूसकर 3rd rank.

हेही वाचा- माजी आमदार नारायण पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; तालुक्यातील ‘या’ कामांची पूर्तता करण्याची केली मागणी

मनोरुग्ण वडिल , बांगड्या विकणारी आई , ऑटो चालवणारा भाऊ , अन् तुराट्याच्या कुडावर छिद्र पडलेले पत्रे अशा घरातली ‘शेख वाशिमा महेबुब’ जेव्हा उपजिल्हाधिकारी होते..

वरील सर्व विद्यार्थ्यांनी ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळवून राष्ट्रीय पातळीवर जीनियस प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसचे नाव उज्ज्वल केले आहे.
या विद्यार्थ्यांना अंकिता वेदपाठक मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक व पालक वर्गामधून कौतुक केले जात आहे.

litsbros

Comment here