जेऊरमनोरंजनसोलापूर जिल्हा

जेऊर येथील चित्रपट दिग्दर्शकाच्या ‘या’ चित्रपटाचा ठाणे येथे झाला शुभ मुहूर्त

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथील चित्रपट दिग्दर्शकाच्या ‘या’ चित्रपटाचा ठाणे येथे झाला शुभ मुहूर्त

जेउर(प्रतिनिधी) जेऊर तालुका करमाळा येथील चित्रपट दिग्दर्शक विशाल राजकुमार कांबळे यांनी लाव चित्रपटाचा नुकताच शुभ मुहूर्त केला आहे. सदर चा मुहूर्त त्याने आपल्या कलाकारांना घेऊन मोठ्या उत्साही वातावरणात पार पाडला आहे नारीसहारा बहुउदेशिय सामाजिक संस्था व व्ही.आ.के.फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत मराठी चित्रपट “लाव” ह्या चित्रपटाचे सी. एन. एम. स्टुडीओ पाचपाखडी ठाणे येथे गाणे रेकाॅर्डींग करुन चित्रपटाचा मुहुर्त संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरवात आक्का भालेराव कांबळे यांच्या हस्ते व्दीपप्रज्वलन पुजन करुन झाली. कार्यक्रमास नारीसहारा बहुउदेशिय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वैशाली पवार , संतोष पवार सचिव योगेश विधाते त्यांचे सहकारी महीला पदाधीकारी उपस्थित होते.

व्ही.आर.के.फिल्म प्रोडक्शन चे राजकुमार कांबळे,संजय मोहीते,संग्राम सरवदे, दिग्दर्शक विशाल राजकुमार कांबळे,सह दिग्दर्शक विशाल बुराडे,अमोल गायकवाड ,एडिटर अनिल थोरात,लेखक श्रीकांत शिंदे,गायक शिध्दार्थ जाधव ,गितकार सुबोध पवार,आकाश पवार,संगितकार मिलींद मोरे,नृत्य दिग्दर्शक राजेश पडवळे,सिनेमाटोग्राफर गणेश पवार,रंगभुषा संतोष भोसले,वेशभुषा सागर राणे,चंद्रशेखर सांडवे प्रोडक्शन प्रमुख नितीन चांदोरकर,भगवंत गुंबाडे,महेश म्हाळसेकर चित्रपटात प्रथमच पदार्पण करणारी अभिनेत्री सुहानी निंबाळकर,अभिनेता तन्मय सांडवे सोबत बाल कलाकार क्षितीजा भालेराव ,उपस्थित होते चित्रपटात सुप्रसिद्ध कलावंत मिलींद शिंदे,अनिल नगरकर,विना जामकर यांचा सुध्दा सहभाग आहे.

हेही वाचा-करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी मोहीम तत्काळ थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करणार; महावितरणला निवेदन व इशारा

कोरोना लसीकरणासाठी करमाळा शहर व तालुक्यातील व्यापारी वर्गाचा प्रामुख्याने विचार करावा

कार्यक्रमाचे नियोजन कार्यकारी निर्माता पोपट जी.कांबळे यांनी केले. लवकरच चित्रपटाच्या शुटींगला नासिक जिल्ह्यातील दिंडोरी व निफाड तालुक्यात सुरवात होणार आहे… यापूर्वीही या जेऊर येथील नवोदित कलाकाराने अनेक चित्रपटाची निर्मिती केली आहे.

लाव चित्रपट भविष्यात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी माहिती नवोदित दिग्दर्शक विशाल कांबळे यांनी बोलताना दिली.

litsbros

Comment here