जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी करमाळा तालुक्यातील खडकी येथील दोघांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी करमाळा तालुक्यातील खडकी येथील दोघांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

करमाळा (प्रतिनिधी);
करमाळा तालुक्यातील खडकी येथे ऊसाचा ट्रॅक्टर शेतातून नेण्याच्या कारणावरून दोघाजणांनी जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी करून त्यापकी एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणी करमाळा पोलिसांत दोघांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माधव नाना नागटिळक (वय-६५ , रा. खडकी, ता. करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २२/०२/२०२२ रोजी सायं. साडेचारच्या सुमारास माझी पत्नी रुक्मिणीसह शेतातील उसतोडीच्या कामगारास मदत करत होतो.

तेव्हा आमच्या शेता शेजारील नानासाहेब केरबा खरात आणि राहुल नानासाहेब खरात ‘तुझा उसाचा ट्रॅक्टर माझ्या शेतातून न्यायचा नाही’ असे म्हणून शिवीगाळ करू लागले. त्यांना मी ‘तुमच्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जात नाही’ असे म्हणताच त्या दोघांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली तसेच राहुल नानासाहेब खरात याने अंगावर धावत येऊन माझ्या शर्टाची कॉलर पकडून हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात हजारो शिवचरित्रांचे वाटप करून पुरोगामी विचारांचा जागर करणारी शिवजयंती संपन्न; सर्वत्र चर्चा

करमाळा तालुक्यातील जेऊर, चिखलठाण, गौंडरे यासह १३ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश; वाचा, कोणत्या ग्रामपंचायतीवर कोण आहे प्रशासक?

या बाबत माधव नाना नागटिळक यांच्या तक्रारीवरून करमाळा पोलिसांनी नानासाहेब केरबा खरात आणि राहुल नानासाहेब खरात यांच्या विरुद्ध विविध कलमांसह ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा तपास पोलिस उप अधीक्षक विशाल हिरे हे करत आहेत.

karmalamadhanews24: