जमियत-उलमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष हजरत मौलाना कारी सय्यद मोहम्मद उस्मान मन्सूरपुरी यांचे दुःखद निधन
आवाटी(प्रतिनिधी) ; दिनांक 21 मे 2021-आज शुक्रवार दुपारी एक वाजून पंधरा मिनिट वाजता जमियात उलमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कारी मौलाना मोहम्मद उस्मान मनसुरपुरी यांचे दुःखद निधन झाले.
जमियात उलमा ई हिंद चे महाराष्ट्राचे अध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी त्यांच्या निधनाने शोक प्रकट करताना म्हणाले की, मौलाना मन्सूरपुरी हे जमियात उलमा- ए-
हिंदचे महत्त्वाचे स्तंभ होते. मौलानाच्या जाण्याने समस्त मुस्लीम समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे.ते ईस्लामचे तत्वज्ञानी व भाष्यकार होते..
मौलानांनी आपल्या संपूर्ण हयातीत देशातील मुस्लिमांना आपल्या ज्ञानाने मार्गदर्शन केले ते
ज्ञानी, सदाचारी, मितभाषी, सर्वांना आपलेसे करणारे ,सर्वांसोबत मिळून-मिसळून राहणारे असे व्यक्तीमत्व होते.
मौलाना मन्सूरपुरी दारुल उलूम देवबंद च्या मदरशांमध्ये व्यवस्थापकीय समितीत कार्यरत होते आणि त्याच बरोबर दीर्घकाळ त्यांनी मिशकात शरीफ आणि इतर इस्लामी पुस्तकांचे धडे विद्यार्थ्यांना देत होते.
जमियात उलमा-ए-हिंद, दारुल उलूम देवबंद आणि ज्या संस्थेत मौलाना मन्सूरपुरी यांनी आपली सेवा बजावली त्या सर्व संस्थांना मौलानांची कमतरता नेहमीच भासत राहील.
जमियत उलमा हिंदच्या महाराष्ट्राच्या कोणत्याही कार्यक्रमात मौलाना कारी मंसुरपूरी आवर्जून उपस्थित राहत आणि आम्हांला मार्गदर्शन,प्रोत्साहन देत असत.त्यांची आठवण आमच्या मनात नेहमीच राहील.
हेही वाचा-शालेय फी साठी तगादा लावला तर शालेय शिक्षण मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही
अल्लाहकडे प्रार्थना करूया की, अल्लाह मौलाना वर विशेष कृपा करावी व त्यांना जन्नतमध्ये श्रेष्ठ स्थान मिळावे.आमिन
Comment here