करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

हाजी हाशमुद्दीन तांबोळी चारिटेबल ट्रस्टचा आगळा वेगळा सामाजिक उपक्रम, गोरगरीब गरजूंना दिवाळी फराळाचे वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

हाजी हाशमुद्दीन तांबोळी चारिटेबल ट्रस्टचा आगळा वेगळा सामाजिक उपक्रम, गोरगरीब गरजूंना दिवाळी फराळाचे वाटप

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); करमाळा येथील सामाजिक संस्था हाजी हाशमुद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टने करमाळा शहरात आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबविला आहे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी सर्वसामान्य गरजू नागरिकांना दिवाळीचे फराळ किट वाटप करून सर्वसामान्यांची दिवाळी गोड केली आहे.

मुस्लिम समाजाचे करमाळा तालुका अध्यक्ष तसेच पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी तसेच नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आमिरशेठ तांबोळी यांच्या हस्ते गरजूंना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी बालाजी झवेरी, श्याम सूळ, दिनेश शिरसागर, तेजस गायकवाड, साबीर तांबोळी, विशाल माळवे तसेच शाहिद तांबोळी आदि कार्यकर्ते उपस्थित होते

करमाळा शहरातील नामांकित हाजी हाशमुद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने प्रत्येक वर्षी पंढरपूर येथे जाणाऱ्या दिंड्यातील वारकऱ्यांना मोफत अन्नदान, गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार व बुंदी वाटप, रमजान ईद दिवशी गरजूंना रमजान ईद चे साहित्य वाटप, कोरोना काळात मोफत मॉस्क वाटप आदि विविध सामाजिक उपक्रम राबविले जाते.

हेही वाचा – मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळावे; करमाळा सकल मुस्लिम समाजाची महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

माढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या महिला उपसरपंचांनी दिला पदाचा राजीनामा; मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी दिवाळीतील गरजू व सर्वसामान्य नागरिकांना दीपावली निमित्त मोफत फराळाचे वाटप करण्यात आले ट्रस्टच्या वतीने गरजवंतांना मोफत दिवाळी फराळाचे वाटप केल्याबद्दल गरजवंतांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसत होते.

litsbros

Comment here