देश/विदेशधार्मिकराष्ट्रीय घडामोडी

हज यात्रेच्या नियमात ‘हे’ मोठे बदल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

हज यात्रेच्या नियमात ‘हे’ मोठे बदल

(प्रतिनिधी) पुढील वर्षी सन 2021 साली होणाऱ्या हज यात्रेसाठी सौदी अरेबिया सरकार व भारत सरकार यांनी नियमात मोठे बदल केले असून पुढील वर्षी होणाऱ्या यात्रेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे.डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत यात्रेचे फॉर्म भरता येणार आहे . 2021 च्या हज यात्रेसाठी इच्छुक असलेल्या यात्रेकरूंनी अधिक माहितीसाठी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन उम्मती सोसायटीचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी केले आहे.पुढील वर्षी होणार्‍या हज यात्रे साठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

सदरच्या हज यात्रेचा कालावधी चाळीस दिवसावरून कमी करून तो 30 ते 35 दिवस करण्यात आला आहे .यात्रेसाठी वय वर्ष 18 ते 65 वयाच्या लोकांनाच परवानगी आहे. 70 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना पुढील वर्षी हज यात्रेस परवानगी नाही.मागील वर्षी एका रूम मध्ये पाच ते सहा लोक राहू शकत होते.

मात्र आता एका रूम मध्ये फक्त तीन लोकांना परवानगी राहील. यात्रेसाठी भरावयाच्या रकमेचा पहिला हफ्ता दीड लाख रुपये राहील . कोरंटाईन संदर्भातील सर्व चार्जेस यात्रेकरूला द्यावे लागतील. भारतातील यात्रेकरूंच्या संख्येत सुद्धा मोठी कपात करण्यात आली असून प्रत्येक राज्यातून फक्त पाचशे लोकांना परवानगी राहील. जम्मू-काश्मीरमधील दोन हजार यात्रेकरुंना परवानगी राहील.

हज यात्रेसाठी भारतातील उड्डाण केंद्रांमध्ये सुद्धा मोठी कपात करण्यात आली असून पूर्वी 21 ठिकाणाहून हज यात्रेची उड्डाने होत होती . याची संख्या पुढील वर्षी 10 करण्यात आली आहे. त्यामध्ये अहमदाबाद, बेंगलोर, कोचीन, दिल्ली, हैदराबाद, कोलकत्ता, लखनऊ मुंबई, श्रीनगर यांचा समावेश आहे.

हेही वाचा – शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा तिसरा वर्धापन दिन; मंगेश चिवटे यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा

दुर्दैवी:माहेरी जाताना बाईकवरून तोल जाऊन खाली पडल्याने ४० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू;माढा-वैराग मार्गावरील घटना

पुढील वर्षी होणाऱ्या या हज यात्रेसाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा तसेच त्यासाठी आवश्यक मार्गदर्शनासाठी उ म्मती सोसायटीशी संपर्क साधावा असे आवाहनही सोहेल बारूदवाला, फिरोज पठाण, डॉक्टर तोफिक शेख, शाकीब शेख,युसुफ लाखानी, माजीद मिर्झा आदींनी केले आहे.अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सोहेल बारूदवाला यांच्या 86989 89894 या नंबर वर संपर्क साधावा .

litsbros

Comment here