करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
आजोबांनी नातवाची काढली हत्तीवरून वरात तर नातवाने आजोबांच्या बड्डे ला आणले हेलिकॉप्टर
आजोबांचा हट्ट होता हेलिकॉप्टरमध्ये बसायचं, नातवांनी बर्थ डेला पुरवली हौस, गावातच बनवलं हेलिपॅड!!
डॉ. नंदकुमार गोडगे यांच्या लग्नात आजोबा देवराम यांनी हत्तीवरून मिरवणूक काढत नातवाची हौस केली होती. आजोबांचीही हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा होती. ती नातवांनी पुरवली. देवराम हे गावी मुलगा शिवाजी यांच्यासोबत राहतात.
हेलिकॉप्टरमध्ये बसविण्यासाठी त्यांना पुण्याला नेण्यात आले. तेथून हेलिकॉप्टर भाड्याने करून चिंचोलीत (ता.संगमनेर) आणून वाढदिवसाला अनोखे गिफ्ट दिले. यासाठी लाखो रूपये गेले, परंतु आजोबांच्या आनंदापुढे ते थिटे होते, असं नातवांना वाटतं.
Comment here