करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

ढगाळ वातावरण पिकांना ठरतयं घातक: पिकांची वाढ थांबली :पेरण्याही लांबल्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ढगाळ वातावरण पिकांना ठरतयं घातक :पिकांची वाढ थांबली :पेरण्याही लांबल्या.

केतूर (अभय माने) बदलत्या व ढगाळ वातावरणामुळे शेतातील उभ्या भाजीपाला पिकावर पडणार्‍या रोगामुळे व किडीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.परतीच्या पावसाच्या नुकसानीतून तो आत्ता कुठे सावरत असतानाच आता हवामानाच्या बदलाच्या संकटांनी मात्र पुरता व हतबल झाला आहे.


उद्या पिकावर तांबेरा, करपा, डाऊनी, भुरी, रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यातच भाजीपाला पिकाचे दर अचानक उतरल्याने औषधाचा खर्च करावा करावा की पिके सोडून द्यावीत अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे.शेती पिकाला गुंतवलेले भांडवलाच्या तुलनेत दर मात्र कमी झाले आहेत.

बियाणे, खते, मजुरी, वाहतूक या सर्वाचा खर्च पाहता सध्या भाजीपाला पिके आली आहेत ती काढण्यापेक्षा सोडून देण्याकडे कल वाढला आहे.
सध्या वातावरणात ऐन थंडीत उष्णता वाढत आहे.

ढगाळ वातावरणाचे दुष्परिणामामुळे मात्र थंडी गायब झाली आहे त्यामुळे पिकाची वाढ खुलली आहे तर, गव्हाची पेरणी लांबली आहे मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे शेतीत वाफसा नसल्याने उशीर झाल्याने गव्हाच्या पेरण्या लांबल्या होत्या.

litsbros

Comment here