काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचे निधन: मविआ सरकार स्थापन करण्यामध्ये होती महत्वपूर्ण भूमिका
कोर्टी प्रतिनिधी: ( अक्षय आखाडे) काँगेस पक्षाचे
ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे बुधवारी (25 नोव्हेंबर) पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास निधन झालं आहे. त्यांचे सुपूत्र फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली . काही दिवसापूर्वी अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांचे आरोग्य अधिकच ढासळले होते.
त्यातून ते सावरू शकले नाहीत.मात्र जास्त त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये वार्ड हलवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. महा विकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये देखील अहमद पटेल यांचे महत्वपूर्ण योगदान होतें . मविआ सरकार ल पाठिंबा देताना वरिष्ठ पातळीवर बोलणी आणि पत्रकार परिषदेत त्याची माहिती अहमद पटेल हेच देत होते.
फैजल पटेल यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हतले आहे की , “आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 नोव्हेंबर रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. फैजल पटेल पुढे लिहतात की, “मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनसाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी”.अस आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
Comment here