दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक, हत्येचं कारण समोर

दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक, हत्येचं कारण समोर

दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. राहुल हंडोरे वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच पथकं त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबईतून पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पाच पथकं तपास करत असताना राहुलने हत्या केल्याची कबुली दिली आहे. 

दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक आहे. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एम पी एस सी ची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारीकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता.

त्याने त्याला एम पी एस सीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि कुटुंबियांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.

राहुलचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पाच पथकं नेमली होती. ही सगळी पथकं मुंबई, सिन्नर, लोणावळा, नाशिक आणि पुण्यात तपास करत होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी राहुलचे आणि दर्शनाचे फोन रेकॉर्ड काढले होते. त्यात दर्शना आणि राहुल नेमकं कोणाकोणाच्या संपर्कात होते याचा शोध पोलीस या रेकॉर्डच्या माध्यमातून घेत होते. राहुलचं लोकेशन चेक करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचं पहिलं लोकेशन बंगळूरू, कोलकाता आणि त्याचं शेवटचं लोकेशन चंदीगडला दिसत होतं. तो ट्रेनने प्रवास करत असल्याचा अंदाज पोलिसांना होता. 

तपासासाठी राहुलच्या कुटुंबियांचा आधार घेतला होता. या सगळ्या प्रवासादरम्यान त्याने घरच्यांकडे पैसे मागितले होते. त्याच्या घरच्यांनी त्याला सुरुवातील पाच हजार, 1500 आणि 500 रुपये पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अकाऊंटवर पाठवले होते. तो नेमका कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याचा फोन सुरु होण्याची वाट बघत होते. पाच ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरु ठेवला होता अखेर राहुलला ताब्यात घेण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे.

karmalamadhanews24: