करमाळाक्राइम

देवीच्या माळावरील एकाला मटका जुगार प्रकरणी करमाळा पोलिसांनी केली अटक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

देवीच्या माळावरील एकाला मटका जुगार प्रकरणी करमाळा पोलिसांनी केली अटक

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा शहर व तालुक्यात मटका व इतर जुगारांना उत आला आहे. पोलिसांची त्यावर नजर ही आहे आणि वेळोवेळी कारवाई केली जात आहे. करमाळा तालुक्यातील जेऊर येथे
कल्याण मटक्याचे आकडे घेत असताना एका तरुणास अटक केली. तो तरुण करमाळा तालुक्यातील श्रीदेवीच्या माळ येथील असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार काल (ता.९) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत भारत ढवळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की जेऊर येथे एक इसम कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावर जेऊर भाग बसस्थानकाशेजारी आम्ही छापा टाकला असता, तेथे प्रविण बाबूराव हिरगुडे (रा.श्रीदेवीचामाळ) हा इसम सायंकाळी पावणेसात वाजता कल्याण मटक्याचे आकडे मोड करत असताना आढळून आला.

त्याच्याकडे ५५० रूपये रोख व एका पांढऱ्या रंगाच्या चिठ्ठीवर आकडेमोड केलेले कागद व पेन आढळून आला. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

रयत क्रांती संघटनेचे दूध दरवाढीसाठी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फटके देत आंदोलन

litsbros

Comment here