लग्नाचे आमिष दाखवून एस टी चालकाने विवाहित महिलेवर केला अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून एस टी चालकाने विवाहित महिलेवर केला अत्याचार 

विवाहितेस लग्नाचं आमिष दाखवून पंढरपूरच्या कंत्राटी एसटी चालकानं वारंवार अत्याचार केला, तसंच बार्शीला आल्यानंतर भेटला, त्यावेळी सोने-चांदीचे दागिने घेऊन पसार झाला. त्याच्यावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

विकास पांडुरंग पाटील (वय २६, रा. शेवते, ता. पंढरपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित कंत्राटी एसटी चालकाचे नाव आहे. ही घटना मे २०२२ ते ४ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडली. पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दाखल केली.

पंढरपूर येथून दररोज बसने नोकरीच्या ठिकाणी जाणे-येणे असल्याने त्या महिलेची कंत्राटी चालक विकास पाटीलशी ओळख झाली. त्याने तिचा फोन नंबर घेतला. दोघांचे सोशल मीडियावर चॅटिंग सुरू झाले. मला तू खूप आवडतेस, तू माझ्याशी लग्न कर, असे त्याने म्हणताच, माझा विवाह होऊन मला मुले असल्याचे तिने सांगितले.

पण, पाटीलने वारंवार संपर्क साधत पंढरपूर, बार्शी येथील तीन नामांकित लॉजवर अत्याचार केले. शुक्रवारी (ता. ४) बार्शीत त्याने येऊन लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर अत्याचार केला. मंगळसूत्र, कर्णफुले, पैंजण घेऊन पसार झाला असून, फोन केला तरी उचलत नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे तपास करीत आहेत.

karmalamadhanews24: