आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

होमिओपॅथी औषधांचे ग्रामपंचायतींना वितरण करावे- डॉ अमोल दुरंदे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

होमिओपॅथी औषधांचे ग्रामपंचायतींना वितरण करावे- डॉ अमोल दुरंदे

प्रतिनिधी (अक्षय आखाडे); होमोईओपॅथी औषधांचे कोरोनाच्या काळात मोठे महत्व असून कोरोनाच्या काळात अनेक देशात प्रतिबंधनात्मक होमोईओपॅथीक आर्सेनिक अल्बम औषधं वापरून कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे भारतातील केरळ राज्य याच उत्तम उदाहरण म्हणता येईल.

अश्या परिस्थितीत महाराष्टातील ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगाच्या व्याजातून सर्वच ग्रामपंचायतींना हे औषधं वितरण करण्यात आले आहे,आपल्या देशातील काही शहरांमध्ये कोरोनाच्या दुसरी लाट सदृश परिस्थितीत निर्माण झाली आहे.

 

अश्या वेळी होमिओपॅथिक हे एकमेक गुणकारी औषधं आहे हे औषध आपल्या जिल्ह्यातील लोकांना मिळणे गरजेचे आहे. म्हणून आपण आपल्या स्तरावरील प्रक्रिया लवकर पूर्ण करून औषधं मिळावे म्हणून आज जिल्हा परिषद, सोलापूर चे नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब यांना सरपंच परिषदेच्या वतीने प्रतिबंधनात्मक आर्सेनिक अल्बम होमोईओपॅथीक औषधानच्या संदर्भात अडकलेली निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करून ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्यावे हि मागणी आज जिल्ह्यातील सरपंच परिषदेचे पदाधिकारी यांनी केली आहे.

यामध्ये करमाळा तालुक्यातील सरपंच परिषदेचे अध्यक्ष यांची भूमिका देखील महत्वाची आहे. करमाळा तालुक्यातील सरपंच परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अमोल दुरंदे यांनी देखील अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे शासनाकडे दिली आहे.

litsbros

Comment here