करमाळासोलापूर जिल्हा

चिंब पावसानं रानं झाली आबादानी करमाळा तालुक्यातील सध्याची परिस्थिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

*चिंब पावसानं रानं झाली आबादानी* करमाळा तालुक्यातील सध्याची परिस्थिती

केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्याच्या जिरायती भागात गेल्या आठवड्याभरापासून नियमित पडणाऱ्या पावसामुळे समाधानाचे वातावरण झाले आहे तर तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्रातील शेतकरीही उजनी जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने आनंदीत झाला आहे. एकूणच तालुक्यातील शेतकरी ” चिंब पावसाने रानं झाली आबादानी ” अशी परिस्थिती झाली आहे.यापुढे पावसाने उघडीप दिल्यानंतर व वापसा झाल्याबरोबर शेतकऱ्यांना खरीप पेरणी करण्याचे वेध लागले आहेत.

तालुक्यात सावडी, कोर्टी, राजुरी,जेऊर ,भाळवणी कुंभेज, देवळाली, साडे, सालसे, पांडे, पोथरे, मांगी, जेऊर, वीट, पोपळज,केम, विहाळ,पोंधवडी,जिंती,कुंभारगाव,रामवाडी,कात्रज,आदि सर्व भागासह तालुक्यात सर्व दूर पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.जनावरांना चारा पिके तसेच कांदा, तूर, मका आदि पिके शेतकरी घेणार आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगाम हमखास पदरात पडेल अशी आशा शेतकरी बाळगून आहेत.

हेही वाचा – “स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस खते व बियाण्यावर लक्ष ठेवण्याची गरज

उन्हाच्या कडाक्यामुळे गाव परिसरातील विहिरी तसेच कूपनलिका (बोअर) तळाशी गेल्या होत्या. आता सुरू झालेल्या पावसामुळे विहिरी भरू लागल्या आहेत तर कुप नलिकाही पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या आहेत.

litsbros