ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशैक्षणिक

तेव्हा हॉटेलात मुक्काम करायला पैसे नव्हते, मायलेकिनी स्टँडवर केला मुक्काम..पण आज आहेत ‘तहसीलदार’

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्रेरणादायी स्टोरी

मायलेकींचा कोल्हापूरच्या बस स्थानकावर मुक्काम

🔹🔸🔹🔸

चारुशीला बाबुराव पवार

गाव… निसराळे तालुका जिल्हा सातारा

सध्या.. अप्पर तहसीलदार श्रीगोंदा

जी माणस यशाचे शिखर सर करतात यामध्ये प्रेरणादायी ठरते आई वडीलांची साथ आणि स्वत:ची जिद्द…

चारुशीला पवार यांच्या वडीलांना एक एकर शेती एक भाऊ.. दोन लेकराच्या शिक्षणासाठी माय सरस्वती या दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करत.. आणि चारुशीला त्यांना सुट्टीत आई बरोबर कामाला जायच्या आतुन शालेय खर्च..!

चारुशीला याचे पहिली ते सातवी पर्यत चे शिक्षण निसराळे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. आठवी ते दहावी शिक्षण घरापासून तीन किमी अंतरावरील अतित येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात झाले. तीन किमीचा दररोज पायी प्रवास करणाऱ्या या बहादुर मुलीने दहावीत पहिला नंबर मिळविला…!११वी १२ चे महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सायन्स काॅलेज मध्ये घेतले

दोन वर्षात शिक्षिकेचे नोकरी मिळेल या ध्येयाने डी एड केले.

मित्रांनो चारुशीला ह्या आईला घेऊन डी एड चा प्रवेश घेण्यासाठी कोल्हापूर ला गेल्या. लाॅज वर राहण्यासाठी पैसे नव्हते म्हणून कोल्हापूर बस स्थानकात मायलेकींनी मुक्काम केला दुसऱ्या दिवशी डी एड चा प्रवेश अर्ज भरला.

दोन वर्षांत डी एड चा अभ्यासक्रम पुर्ण केला सन २०१२ ला प्राथमिक शिक्षिकेची नोकरी आणि बाहेरून पदवी अभ्यासक्रम सुरू केला बी ए चा निकाल लागण्यापूर्वी चारुशीला यांनी सन २०१५ ला एम पी एस सी ची पहिली परीक्षा दिली सेल्स टॅक्स आॅफीसर सन २०१५ ला एम पी एस सी ची दुसरी परिक्षा दिली आणि डी वाय एस पी झाल्या पण शेतकऱ्यांना सेवा आदर मान सन्मान देण्यासाठी मनात तहसीलदार होण्याची इच्छा होती. चारुशीला पवार यांनी डी वाय एस पी ची नोकरी स्विकारली नाही.

सन २०१७ ला एम पी एस सी ची परीक्षा दिली आणि या बहादुर मुलींचे तहसीलदार म्हणून सिलेक्शन झाले. आणि श्रीगोंदा येथे अप्पर तहसीलदार म्हणून सेवेचा श्रीगणेशा सुरू केला आहे एखाद्या गिर्यारोहक प्रमाणे अडथळ्यांची शर्यत पार करीत चारुशीला पवार यांनी यशाचे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले.

कृषी कन्या चारुशीला पवार मॅडम यांच्या जिद्दीला सलाम.!

हेही वाचा- सोलापूरची लेकी ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये; कार्यक्रम पाहण्यासाठी आमदारांनी गल्लीत लावली LED स्क्रीन

गावाने केली ‘ही’ एक युक्ती आणि गावात बिबट्या यायचा कायमचं बंद झालं!

litsbros

Comment here