ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बॉडीबिल्डिंग मधील सर्व किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बॉडीबिल्डिंग मधील सर्व किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं निधन

तुम्ही जर स्वत:ला फिट समजत असाल तर थोडं थांबा, कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण तुम्ही म्हणत असाल की मी फिट आहे माझी चांगली बॉडी आहे तर असं नाही.

बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं निधन झालं. जगदीश अवघ्या 34 वर्षाचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

नवी मुंबईत राहणाऱ्या जगदीशने गेल्या वर्षी बडोद्यात व्यायमशाळा सुरु केली होती. त्यानिमित्ताने तो बडोद्यात असायचा. गेल्या काही दिवसांपूर्वी जगदीशला कोरोनाची लागण झाली होती. अखेर त्याचं निधन झालं.

जगदीश लाडने कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्याने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. एवढंच नव्हे तर मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तसंच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.

हेही वाचा-करमाळ्यात रेडमिसिविर इंजेक्शनचा काळाबाजार! संबंधित पंचायत समिती कर्मचारी व डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अंदमान-निकोबारमध्ये पिकणारे ‘गुलाबी सफरचंद’ आले केत्तुरमध्ये; परसबागेत लावली आहेत रोपे

त्याच्या निधनावर महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने दुःख व्यक्त केलं आहे. एक नावाजलेला चेहरा गेल्याने बॉडीबिल्डिंग विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. पण त्याचबरोबर आपण फिट असल्याचा तोरा मिरवणाऱ्या लोकांनाही सावध करुन गेला आहे.

litsbros

Comment here