ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुर्दैवी:भंडारा जिल्हा रूग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुर्दैवी:भंडारा जिल्हा रूग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू

भंडारा:सगळीकडे हळहळ व्यक्त करणारी घटना शनिवारी पहाटे घडली.भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शॉट सर्कीटमुळे आग लागली.या लागलेल्या आगीत १० नवजात बालकांना जीव गमवावा लागला.नुकतेच्या जन्मलेल्या १० नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 याबाबत मिळालेली सविस्तर माहीती अशी की, भंडारा जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णालय हे गरिब आणि दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी मोठे आधारवड आहे. त्यामुळे या रुग्णालयात सर्व प्रकारच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. जन्मल्यानंतर नवजात बालकाला काही त्रास उद्भवल्यास, वजन कमी असल्यास, बाळाची प्रकृती ठीक नसल्यास त्याला अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU )ठेवण्यात येत असते. सामान्य रुग्णालयाच्या SNCU मध्ये एकूण १७ नवजात बालक दाखल होती.


जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले होते. त्यावेळी ड्युटीवर हजर असलेल्या परिचारिकेने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर
तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य
सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये फुटबॉल आणि इनवन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील १० मुलांचा मृत्यू झाला आहे.

माहिती मिळताच अग्रिशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली.रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं.अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत.
त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले.तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा – ग्रामपंचायत मतदानाच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावांचे बाजार भरणार नाहीत; जिल्हाधिकारी शंभरकर यांचा आदेश

नारळाच्या झाडावरून घरात जाऊन चोरी करणार्‍या सफाई कामगाराला अटक;पंढरपूर शहर पोलीस ठाणे ची उत्कृष्ट कामगिरी

या दूर्दैवी घटनेनंतर रुग्णालयाबाहेर आरडाओरडा सुरू झाला. मयत बालकांच्या कुटुंबांनी हंबरडा फोडला. तर रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक
अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी रुग्णालय गाठत घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठकही झाली आहे.

litsbros

Comment here