ओ शेठ… चा सोशल मीडियावर धुमाकूळ
केतूर (अभय माने); सोशल मीडियावर केव्हा कशाला डिमांड येईल हे सांगता येत नसले तरी सध्या मात्र सोशल मीडियावर मात्र ओ शेठ ने अक्षरशः धुमाकूळ घालत असल्याचे चित्र आहे.
जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली…नावाला तुमच्या डिमांड आली…ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट….तुम्ही माणूस हाय लय ग्रेट… या गाण्याने सोशल मीडियावर सध्या अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोणताही कार्यक्रम ओ शेठ.. या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही.असेच दिसून येत आहे.
सध्या व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्टेटस या सर्व ठिकाणी ओ शेठ… नेच धुमाकूळ घातला आहे.पेट्रोल, डिझेल,घरगुती गॅस यांच्या किमती वरचेवर वाढत आहेत.
त्यामुळे राजकारणापासून ते थेट क्रिकेट, शेतमजूर, नोकरदार, मित्र कंपनी तसेच गाव पातळीवरील पुढारी यांचे फोटो एडिट करून या गाण्याचा व्हिडिओ बनवला जात आहे या व्हिडिओ बनवला जात असून लाईकही चांगले मिळत आहेत.
सध्या कोरोना महामारीची चर्चा कमी, अन् या शेठचीच चर्चा जास्त होत आहे. ओ शेठ….या गाण्याची व्हिडिओ तयार करताना कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ना! ! याचा विचारही होणे गरजेचे झाले आहे अन्यथा यापासून अनर्थ घडण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
करमाळा येथील हॉटेलात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या ‘त्या’ दोघांना बार्शी कोर्टात जामीन
Comment here