आरोग्यताज्या घडामोडीदेश/विदेश

राजकीय सीमा मोडून, देशात प्रत्येकाच्या स्टेट्सवर झळकणारे व्यक्तिमत्त्व; साधी राहणी उच्च विचारसरणी असलेलं लोकाभिमुख नेतृत्व ‘मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी’

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राजकीय सीमा मोडून, देशात प्रत्येकाच्या स्टेट्सवर झळकणारे व्यक्तिमत्त्व; साधी राहणी उच्च विचारसरणी असलेलं लोकाभिमुख नेतृत्व ‘मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी’

सध्या सर्वत्र हाहाकार माजवणाऱ्या कोरोनावर आपल्या राज्यात सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयात सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेऊन देशात चर्चेचा विषय बनलेले मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे खरोखरच कौतुकास पात्र आहेत.

मुख्यमंत्री असून देखील ना कसला रुबाब, ना सूट-बूट एकदम साधं सिम्पल राहणं हे सगळ्यांच मन जिंकून घेत. दाक्षिणात्य चित्रपटात जसं तिकडचे हिरो जसं करतात त्याहून सुद्धा जास्त आज करून दाखवलं रेड्डीनी.

कोरोनाच्या जागतिक महामारी मध्ये संपूर्ण राज्यात कोरोनावरील उपचार मोफत देणे यावरून दुसरा चांगला कोणता निर्णय होऊच शकत नाही.

सगळ्या राज्यकर्त्यांनी जगनमोहन रेड्डी यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे.फोटोमध्ये दिसणारा हा भव्य जनसमुदाय कदाचित या त्यांच्या धडक निर्णय घेण्याचा तसेच साधेपणा यामुळंच त्यांच्याशी जुळला गेला असावा.

येडुगुरी संदिंती जगनमोहन रेड्डी उर्फ जगन हे एक भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व आंध्र प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्यांचे पुत्र असलेल्या जगन ह्यांनी २०११ साली काँग्रेसमधून वाय.एस.आर. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला व ते पक्षाध्यक्ष बनले.
पक्ष: वाय एस आर काँग्रेस
जन्मतारीख२१ डिसेंबर, १९७२ (वय ४८ वर्ष) 
जन्मस्थळजमालामादुगु
शिक्षण: प्रगती विद्यालय (१९९४), हैदराबाद पब्लिक स्कुल बेगमपेट
आज्या/आजोबा: वाय, एस, राजा रेड्डी

असा दूरदृष्टी असणारा जनसामान्यांचा मुख्यमंत्री सर्वांना लाभो

कडक सॅल्युट जगनमोहन रेड्डी…!!

litsbros

Comment here