ताज्या घडामोडीदेश/विदेश

बीसीसीआयची मोठी घोषणा; IPL चे सर्व सामाने रद्द

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बीसीसीआयची मोठी घोषणा; IPL चे सर्व सामान रद्द

इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे सामने देशातील कोरोना संकट आणि त्याचा उद्रेक पाहता स्थगित करण्यात आले आहेत. जैव-सुरक्षित वातावरणातही (बायो बबल) कोविड -19 संक्रमणाने खेळाडू सापडल्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाची इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहा तसेच त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर अमित मिश्रा पॉझिटिव्ह सापडल्याने ही घोषणा करण्यात आली. यापूर्वी सोमवारी चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक एल. बालाजी आणि कोलकाता नाईट रायडर्सचे गोलंदाज संदीप वॉरियर्स आणि वरुण चक्रवर्ती हे पॉझिटिव्ह आढळले होते.
यापूर्वी वाढत्या संक्रमणांमुळे आयपीएलचे दोन सामने तहकूब करण्यात आले होते.

याआधी अशी शक्यता वर्तवली जात होती की सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार आहेत. मात्र आता राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे.

हेही वाचा-पंढरपूर पोटनिवडणुक राजू शेट्टींनी प्रचारात मतदारसंघ पिंजून काढला पण त्यांच्या उमेदवाराला मतं पडली फक्त…

पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितला अवघी 1196 मतं; स्वतः ऍड प्रकाश आंबेडकर व फौज होती प्रचाराला

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून आयपीएलला सुद्धा याचा फटका बसला आहे. एकापाठोपाठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे आयपीएल सीझन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याबद्दल राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे.

litsbros

Comment here