करमाळाधार्मिक

उत्साही वातावरणात करमाळा शहर व तालुक्यात बकरी ईद साधेपणाने घरातच साजरी

करमाळा शहर व तालुक्यात बकरी ईद साधेपणाने साजरी

जेउर (प्रतिनिधी); करमाळा शहर व तालुक्यात आज बकरी ईद अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.
प्रतिवर्षी बकरी ईद मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात येत असते, मात्र यंदाच्या वर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर बकरी ईद अत्यंत साधेपणाने मुस्लिम बांधवांनी साजरी केली.

मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज ईदगाह मैदानावर अदा न करता, ईदची नमाज प्रत्येक मुस्लिम बांधवांनी घरीच अदा केली. यावेळी प्रत्येक मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

करमाळा शहर तसेच तालुक्यातील मुस्लिम बहुल भागात विशेषता जेऊर, साडे, केम, कंदर, पारेवाडी, आवाटी, उमरड, जातेगाव, वडगाव आदी भागात ईद साधेपणाने साजरी करण्यात आली.

हेही वाचा- आज शनिवारी ग्रामिणमध्ये एकही नाही तर करमाळा शहरात एकूण 22 नवे कोरोना रुग्ण; वाचा कोणत्या भागातील आहेत नवे रुग्ण.?

बापरे! वडील गाळे विकणारच होते.. मग मुलगा बनला कर्दनकाळ; माढा तालुका हादरला; आठवड्यातील दुसरी घटना

एकंदर पाहता करमाळा शहर व तालुक्यात बकरी ईद कोरोना च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.

“अन्यथा रस्त्यावर उतरू..” ‘या’ मागणीसाठी माजी आमदार नारायण पाटील यांचा इशारा

बापरे! वडील गाळे विकणारच होते.. मग मुलगा बनला कर्दनकाळ; माढा तालुका हादरला; आठवड्यातील दुसरी घटना

litsbros

Comment here