अक्कलकोटराजकारणसोलापूर जिल्हा

अक्कलकोट येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न; निरीक्षक अभिषेक आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले पक्ष मजबूत करण्याचे आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अक्कलकोट येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न; निरीक्षक अभिषेक आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले पक्ष मजबूत करण्याचे आवाहन

(प्रतिनिधी) ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष तथा अक्कलकोट, बार्शी व माळशिरस चे निरीक्षक अभिषेक आव्हाड यांनी आपल्या कामाला जोरदार सुरुवात करून बार्शी पाठोपाठ अक्कलकोट येथे पाहिली आढावा बैठक आयोजित केली होती.

हि बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, सोलापूर जिल्हा युवक निरीक्षक शरद लाड, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्राम गृह अक्कलकोट येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये निरीक्षक अभिषेक आव्हाड यांनी पक्ष वाढी संदर्भात पदाधिकाऱ्यांना काही कानमंत्र दिले.

तसेच अक्कलकोट तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट प्रमाणे व शहरामधील 21 वार्ड प्रमाणे वार्ड अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व इतर पदांच्या निवडी करून जास्तीत जास्त पदाधिकार्यांच्या निवडी करण्याच्या सूचना दिल्या, तालुक्यातील युवकांचे प्रश्न जास्तीत जास्त कसे सोडवले जातील याकडे मी प्रामुख्याने लक्ष देणार असून महिन्यातून एक वेळेस अक्कलकोट ला बैठक घेणार असल्याचे सांगितले.

तालुकाध्यक्ष यांनी पंधरा दिवसांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटांमध्ये व शहराध्यक्ष यांनी शहरातील प्रत्येक वार्डमध्ये मिटींगचे आयोजन करून स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार व धोरण प्रत्येक घरा घरामध्ये पोहोचवण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा-पंढरपूरला जाणाऱ्या ‘या’ रस्त्यावरच्या खड्ड्यात केले रक्तदान शिबीर; प्रशासनाला जाग येणार का.?

शेतीतील उत्पन्न वाढीसाठी माती परीक्षण करुन खत व्यवस्थापन करणे गरजेचे; उमरड येथे कृषिकन्या संध्या बदेचे आवाहन

यावेळी या कार्यक्रमास अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मनोज निकम, युवा नेते अविराज सिद्धी, श्रीसेल चीतली, वैभव मोरे, समर्थ तोवर, महादेव पवार, प्रमोद सोमवंशी, धनंजय मचाले, जाकीर तांबोळी, गणेश राऊत, प्रदीप सोमवंशी, कुणाल सुरवसे,स्वराज्य घाडगे, पवन पाटील, हर्षद मोरे, प्रदीप मोरे, संकेत पवार, लक्ष्मण काळे, चैतन लिम्बीतोटे सह अनेक युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश कलशेट्टी यांनी केले होते.

litsbros

Comment here