अक्कलकोटक्राइमसोलापूर जिल्हा

दुर्दैवी: आजाेबांच्या डाेळ्यांदेखत नातवाचा ट्रकच्या चाकाखाली मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुर्दैवी: आजाेबांच्या डाेळ्यांदेखत नातवाचा ट्रकच्या चाकाखाली मृत्यू

अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ गावातील असद अल्ताफ बागवान असे मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे असदचे आजाेबा (सरदार बाबू बागवान) यांनी जागेवरच हंबारडा फाेडला. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सोलापुरात एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सोलापूर  शहरात पुन्हा एकदा जड वाहतुकीने एका तीन वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतला आहे. सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील वालचंद महाविद्यालय परिसरात ट्रकच्या चाकाखाली चिमुकला आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

सोलापुरात तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज चौकात जड वाहनाच्या धडकेत एका दहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच ही दुसरी धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी करत संताप व्यक्त केला आहे. पोलीस ट्रक चालकाचा शाेध घेताहेत.

litsbros

Comment here