आवाटी येथील ग्रामदैवत हजरत आबीदअली शाह यांच्या ऊरुसास आजपासून प्रारंभ;

आवाटी येथील ग्रामदैवत हजरत आबीदअली शाह यांच्या ऊरुसास आजपासून प्रारंभ 

 करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख);

हिंदू मुस्लिम एकतेचे आगळे वेगळे दर्शन घडविणारे व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आवाटी येथील ग्रामदैवत हजरत सय्यद आबिद अली शाह कादरी रहमतुल्लाह यांच्या ऊरुसास उद्या दिनांक 16 मे 2024 गुरुवार पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती ऊरुस पंच कमिटीने दिली आहे

हजरत सय्यद आबिदाली शहा कादरी यांच्या ऊसानिमित्त दिनांक 16 मे 2024 रोजी रात्री दर्गाह पटांगणावर आसिफ अजमेरी कव्वाल गायक अहमदाबाद तसेच छोटी तमन्ना बानू दिल्ली कवाली गायिका या दोघांमध्ये कव्वालीची मैफिल रंगणार आहे सदर कव्वाली चा मुकाबला पाहण्यासाठी आवाटी तसेच पंचक्रोशीतील असंख्य भाविक उपस्थित राहणार आहे.

हेही वाचा – मतदानाचा टक्का वाढणार कसा? सरकारी लाभ घ्यायला धावणारे नागरिक मतदान का टाळतात.? वाचा सविस्तर!

तरुणांनो तुमच्या धडावर तुमचाच मेंदू असुद्या, जग जिंकता येते; शारदा व्याख्यानमालेत जगदीश ओहोळ यांचे प्रतिपादन

याशिवाय दिनांक 17 मे 2024 शुक्रवार रोजी मुख्य संदलची मिरवणूक दर्गाह पासून रात्री निघणार असून यामध्ये दर्गाहचा मानाचा घोडा असणार आहे सदर संदलची मिरवणूक गावामधून निघणार असून प्रमुख मार्गावरून निघून अखेर दर्गाह पटांगणावर पहाटे पोहोचणार आहे यामध्ये रजाक ब्रास बँड करमाळा, जनता ब्रास बँड पाटोदा, तसेच झंकार ब्रास बँड ईट, तसेच स्वर संगम बेंजो पथक आलेश्वर हे बँड पथक आपली कला सादर करणार आहे दर्गाह पटांगणावर विजापूर येथील सादिक भाई यांनी पूर्ण रंगबिरंगी आकाराचे डेकोरेशन केलेले आहे

सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन आवाटी येथील ऊरुस पंच कमिटी तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

karmalamadhanews24: