आमदार शिंदे बंधूंचा जुनी पेन्शन योजने संदर्भातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपास पाठिंबा जाहीर दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले पाठिंबा जाहीर केल्याचे लेखी पत्र

आमदार शिंदे बंधूंचा जुनी पेन्शन योजने संदर्भातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपास पाठिंबा जाहीर

दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले पाठिंबा जाहीर केल्याचे लेखी पत्र

माढा / प्रतिनिधी – सध्या संपूर्ण राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि प्राथमिक व माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांनी शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता 14 मार्चपासून बेमुदत संप सुरू केला आहे या संपाला वाढता प्रतिसाद मिळत असतानाच माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे व करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे या दोघा शिंदे बंधूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या लेखी पत्राद्वारे कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.या दोघांनीची पत्रे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून कर्मचाऱ्यांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

शासनाने नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केली आहे.त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता संघटनेच्या वतीने शासनाला निवेदन देणे, काळ्या फिती लावून काम करणे, एक दिवस सामूहिक रजा आंदोलन करणे, सामूहिक मोर्चा काढणे आदी प्रकारच्या लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने शासनाकडे मागणी रितसर मागणी केली परंतु आजतागात शासनाने यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.याच्या निषेधार्थ राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने हा बेमुदत बंद पुकारलेला आहे असे दोघांनीही आपापल्या पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा – भूमी अभिलेख कार्यालयाच्या अंदाधुंद व भोंगळ कारभारा विरोधात साडे येथील शेतकरी कुटुंबासहीत करणार करमाळा तहसील समोर आत्मदहन

आ.संजय मामा समर्थकांनी आयोजित केलेल्या महिला दिन व सावित्रीमाई स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘माहेर मेळाव्या’ला महिलांची प्रचंड गर्दी; तहसीलदार समीर माने यांचे मार्गदर्शन

शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही अत्यावश्यक व जिव्हाळ्याची मागणी आहे त्यामुळे विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या 14 मार्च पासूनच्या बेमुदत बंदला अनुक्रमे माढा व करमाळा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघाच्या वतीने पाठिंबा जाहीर करीत आहोत असेही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या स्वतंत्र पत्रात म्हटले आहे.

फोटो ओळी – 1)आमदार बबनराव शिंदे, माढा विधानसभा

2) आमदार संजयमामा शिंदे, करमाळा विधानसभा

karmalamadhanews24: