करमाळाताज्या घडामोडीसांस्कृतिकसोलापूर जिल्हा

..म्हणून करमाळयातील ९६ पायऱ्यांच्या विहिरीला ‘हत्ती बारव’ ही म्हणतात.. करमाळाकरांनो नक्की वाचा तो ‘अभिमानास्पद इतिहास’

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

म्हणून करमाळयातील ९६ पायऱ्यांच्या विहिरीला ‘हत्ती बारव’ ही म्हणतात.. करमाळाकरांनो नक्की वाचा तो ‘अभिमानास्पद इतिहास’

करमाळा माढा न्यूज; पूर्वीपासूनच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी करमाळा येथील श्री कमलाभवानी मंदिरा जवळील ९६ पायऱ्यांची विहीर सैराट चित्रपटानंतर जगप्रसिद्ध झाली. अगदी संपूर्ण भारतातून पर्यटक मंदिर व या अद्भुत विहिरीला भेट देण्यासाठी येत असतात. मंदिराजवळील या विहिरीचा इतिहास आपण जाणून घेऊया. मंदिराच्या पूर्व दरवाजासमोरील बगीचा ओलांडून आपण पुढे गेलो की, आपल्या नजरेस येते ती दक्षिणोत्तर लांब अशी अष्टकोनी प्रचंड विहीर..!

स्थापत्य कलेचा हा अप्रतिम नमुना पाहून लोक जे आश्चर्य व्यक्त करतात ते शब्दात व्यक्त करणे अशक्यच. या विहिरीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीला एकूण ९६ पायऱ्या आहेत. म्हणून ती ९६ पायऱ्यांची विहीर किंवा बारव म्हणून प्रसिद्ध आहे. छनीने घाव घातलेल्या दगडांनी ही बारव बांधली आहे. पूर्ण दगडी असणारी ही विहीर कठड्यावर उभे राहून आत डोकावल्यास गरगरल्या शिवाय राहत नाही.

विहिरीत आत उतरण्यासाठी अशा आखीव रेखीव ९६ पायऱ्या आहेत.

(टीप; सध्या कोरोना व लॉकडाऊन मुळे सर्व पर्यटन स्थळे, मंदिरे बंद आहेत. आता इतिहास वाचूया.)

हत्ती बारव-

या विहिरीवर पूर्वी रावरंभा काळात ‘हत्तीची मोट’ चालत असे व त्यातून वापरास व बागेस पाणी काढले जात असे, असे सांगितले जाते. या विहिरीविषयी असेही सांगितले जाते की, कामालादेवीच्या भव्य मंदिराला जो एकूण खर्च आला, त्यापेक्षा एक ‘तौली’ (तत्कालीन नाणे) जास्त खर्च या ९६ पायऱ्यांच्या विहिरीच्या कामासाठी आला. या गोष्टीची खात्री ही भव्य विहीर पाहून पटतेच.

या विहिरीवर ‘हत्तीची मोट’ चालत होती, या गोष्टीला आधार देणाऱ्या खुणा विहिरीजवळ आहेत. मोटे साठीची जागा हा त्याचा पुरावाच म्हणावा लागेल. सोबतच इतिहास चाळल्यावर एक खात्रीशीर पुरावा मिळतो, तो म्हणजे श्रीमती काशीबाई कानिटकर यांच्या आत्मचरित्रातील उल्लेख.

हेही वाचा- अपयश आल्यावर वडील म्हणाले,’फक्त शेत विकलंय अजून किडनी आहे’; मुलगा दुसऱ्याच प्रयत्नात झाला IAS

हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी

सैराट चित्रपट शूटिंग काळात हत्ती बारवेत दिग्दर्शक नागराज मंजुळे, गीत संगीतकार अजय अतुल

श्री गोविंदराव कानिटकर हे काशीबाई यांचे पती. इ.स. १८९१ ते १८९३ या काळात करमाळा कोर्टात सब जज्ज म्हणून काम पाहत होते. या काळातील व करमाळयातील आठवणी मांडताना ‘बदलीची आणखी काही गावे’ या प्रकरणात ‘९६ पायऱ्याच्या विहिरीचा’ संदर्भ सापडतो.

त्यात काशीबाई लिहितात की, “देवळाच्या पायथ्याला असलेल्या आनंदबागेत हत्तीच्या मोटेचे पाणी जात असे.” अशी स्पष्ट नोंद सापडते. ही मोट ओढणाऱ्या हत्तीची समाधी या विहिरी शेजारी दाखविली आहे. अशी ही करमाळयाची ९६ पायऱ्यांची विहिर व अशी ही हत्तीची मोट महाराष्ट्रात एकमेवच म्हणावी लागेल. हे जगात करमाळयाचे वैशिष्ट्य आहे.

सध्या सुरक्षिततेसाठी लावलेला फलक

अशी ही ऐतिहासिक करमाळा हत्ती बारव, आई कमलाभवानी मंदिर व करमाळा नगरी पाहण्यासाठी अनेक पर्यटक करमाळयाला आवर्जून येताना दिसतात.

संदर्भ- आई कमलाभवानी आणि करमाळयाचा संक्षिप्त इतिहास

___________________________________________

सुपरफास्ट बातम्या मिळवण्यासाठी ‘करमाळा माढा न्यूजची’ बातमी उघडल्यानंतर खाली दिसणाऱ्या बेल आयकॉन अथवा – ALLOW बटनावर क्लिक करा,
आणि मिळवा प्रत्येक बातमी थेट मोबाईलवर.
जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 70 58 59 29 90 
———————————————————————ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9067564080 हा नंबर तुमच्या ग्रुपला ऍड करा. किंवा वैयक्तिक मिळवण्यासाठी लिहा “Karmala Madha News”

litsbros

Comment here