अक्कलकोटआरोग्यकरमाळापंढरपूरपंढरपूरबार्शीमंगळवेढामाढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी व जनावरांचे बाजार ३१ जुलैपर्यंत बंदच; जिल्हाधिकारी शंभरकर

जिल्ह्यातील सर्व आठवडी व जनावरांचे बाजार ३१ जुलैपर्यंत बंद

तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी

सोलापूर (३० जून) – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज ३० जून रोजी आठवडी बाजार बंद करण्यासंदर्भात आदेश लागू केला आहे.


सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचा बाजार, मॉल्स आता दिनांक ३१ जुलै २०२० च्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस होऊ शकते.

हेही वाचा- म्हणून आषाढी एकादशीची जबाबदारी सोलापूरचे जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या ऐवजी डॉ.राजेंद्र भोसलेंकडे

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आज मंगळवारी १७ नवे रुग्ण; त्यात पंढरपूरातील ७, वाचा इतर कोणत्या तालुक्यातील किती.?

त्यामुळे लोकांचा समूह एकत्र जमू नये, यासाठी सर्व प्रकारचे आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, मॉल्स भरवण्यास आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी

कोरोना या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पानपट्टी, मावा विक्री, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री केंद्र बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.


तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान करणे यामुळे कारोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला ३१ जुलै २०२० रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती संस्था अथवा संघटना यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे नमूद आदेशात म्हटले आहे.

litsbros

Comment here