अक्कलकोटधार्मिकसोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील दुधनीच्या सिद्धरामेश्वर यात्रेस सोमवारपासून प्रारंभ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूरप्रमाणेच पार पडते यात्रा…

दुधनी ( १० जानेवारी) – अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेस सोमवार, १३ जानेवारी पासून प्रारंभ होत आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सिद्धरामेश्वर यात्रा पंचकमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी यांनी दिली.

जाहिरात

सालबादप्रमाणे यंदाही श्री शांतलिंगेश्वर विरक्तमठ दुधनी यांच्या आश्रयाखाली म.नि.प्र.डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा संपन्न होणार आहे. सोमवारी १३ जानेवारी रोजी तैलाभिषेकाने (यण्णीमज्जन) यात्रेस सुरुवात होणार आहे. श्री सिद्धेश्‍वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची मिरवणूक १३ ते १६ जानेवारी या काळात पारंपरिक प्रथेनुसार निघणार आहे.

मंगळवार, १४ जानेवारी रोजी नंदीध्वजांची मिरवणूक, सम्मती कट्यावर सम्मती वाचन, अक्षता समारंभ आयोजित करण्यात आले आहे. बुधवार, १५ जानेवारी रोजी श्री मल्लिकार्जुन पालखी, मानाचे पाचही नंदीध्वजांची मिरवणूक, मकर संक्रांतनिमित होम विधी, होम मैदानावर होम प्रदीपन सोहळा आयोजित करण्यात आले आहे.

जाहिरात

गुरुवार, १६ जानेवारी रोजी मानाचे पाचही नंदीध्वजांची मिरवणूक, होम मैदानावर शोभेचे दारूकाम त्यांतर गायन कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार, १७ जानेवारी रोजी दु ४ वा प्रसिद्ध मल्लांच्या जंगी कुस्त्या, रात्री गायन कार्यक्रम होणार आहे.

शनिवार, १८ जानेवारी रोजी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चंद्रशेखर दैवज्ञ व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. टी.टी. राठोड यांच्या उपस्थितीत योग्य जनावरांचे निवड व म.नि.प्र. महांतेश्वर महास्वामी विरक्तमठ मैंदर्गी यांच्या शुभहस्ते निवड झालेल्या जनावरांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. तरी पंचक्रोशीतील भक्तांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा पंच कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा; अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरने घेतला दोघांचा जीव; पूर्व सोगाव गावावर शोककळा

litsbros

Comment here