आरोग्यकरमाळा

वातावरण बदलाने तालुक्यात साथीच्या आजारात वाढ: गावोगावची आरोग्य केंद्र मात्र सलाईनवर

केतूर ( राजाराम माने) परतीचा पाऊस सप्टेंबर सुरू झाला तरी थांबत नसल्याने त्याचा विपरीत परिणाम शेतीबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला असून ग्रामीण भागात साथीच्या रोगांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

डेंगू,डेंगूसदृश्य चिकनगुनिया,गोचीडताप,थंडी,ताप याबरोबरच सर्दी,अंगदुखी,खोकला, टायफाईड अशा विविध विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढत असताना आरोग्य खात्याचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचे मत आहे.

यावर्षी परतीच्या पावसाने जाताजाता सर्वांनाच बेजार केल्याने व वातावरणातील सततच्या बदलाने कधी कडाक्याचे ऊन,कधी पाऊस,कधी ढगाळ वातावरण,कधी धुके तर कधी थंडी तर कधी अचानक बरसात यामुळे वातावरणात अचानक बदल होत आहे असे वारंवार बदलणारे हवामानामुळे विषाणूजन्य आजारांनी हातपाय पसरले आहेत.गेल्या काही दिवसापासून खाजगी रुग्णालय तसेच मेडिकल मात्र हाऊसफुल झाली आहेत.त्यातच तांबड्या पेशी कमी जास्त होणे,पांढरे पेशी कमी जास्त होण्याचे प्रमाण असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे या ठिकाणी उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागरिक बारामती, पुणे,बार्शी येथील उपचाराला पसंती देत आहेत.

सततच्या पावसामुळे चिखल,दलदल झाल्याने ठिकठिकाणी डासांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामपंचायती व आरोग्य विभागाने जनजागृती करून फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करणे गरजेचे आहे मात्र याबाबत सदर यंत्रणा अद्यापही सुस्त असल्याचेच चित्र आहे.त्यातच ग्रामीण भागातील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता व आहे हे कर्मचारी बेपत्ता.असे विदारक चित्र असून याबाबत सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

litsbros

Comment here