करमाळाताज्या घडामोडीमाढाराजकारणसोलापूर जिल्हा

वंचित कडून करमाळा विधानसभेच्या रिंगणात जिल्हा परिषद सदस्य निळकंठ देशमुख..? क्लिक करुन वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वंचित ची उमेदवारी साठी देशमुख यांनी घेतली चंदनशिवे यांची भेट

करमाळा माढा न्यूज; करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात निवडणुक जशी जवळ येत आहे तसे नवनवे रंग भरत आहेत. लोकसभेचा निकाल पाहता आता ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी ला ही खूप महत्व प्राप्त झाले आहे.

करमाळा विधानसभा निवडणुकीच्या 2014 चा निकाल पाहता अवघ्या 200 मतांवर विजय पराजय फिरला, तिथे आता वंचित आघाडीची मते तर निर्णयाकच आहेत.
आज सोमवारी करमाळा तालुक्यातील मोठे राजकीय नेते, वांगी गटातील जिल्हा परिषद सदस्य नीळकंठ आप्पा देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडी चे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांची सोलापूर येथे भेट घेऊन विधानसभा तिकीट मिळावे म्हणून फिल्डिंग लावली अशी माहिती सूत्रांनी दिली. तर बाळासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील वंचितचे उमेदवार निवडी विषयक अधिकार प्रवक्ते चंदनशिवे यांना दिलेले आहेत असे बोलले जाते. तर आज आनंद चंदनशिवे यांनी निळकंठ देशमुख याना उमेदवारी बद्दल ‘निश्चित रहा’ असा शब्द दिला आहे.

उमेदवारी बद्दल तुम्ही निश्चित राहा, तुमच्या उमेदवारी बद्दल बाळासाहेबांना बोललो आहे, उद्या पर्यंत तुम्हाला फायनल सर्व कळवले जाईल, असे मला चंदनशिवे म्हणाले, पण मीही माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून निवडणूक लढवण्यासंबंधी उद्या निर्णय घेणार आहे. असे निळकंठ देशमुख यांनी करमाळा माढा न्यूज शी बोलताना सांगितले.

तर दुसरीकडे निळकंठ देशमुख यांची उमेदवारी हा आमदार नारायण पाटील यांना धक्का मानला जात आहे.

litsbros

Comment here