ताज्या घडामोडीराजकारणसोलापूर जिल्हा

लक्ष्मण ढोबळे यांचे अजित पवार यांना जोरदार उत्तर, वाचा काय म्हणाले ढोबळे

सध्या भाजपात असलेले व पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यावर टीका करताना  राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना थेट नाच्याची उपमा दिल्या नंतर आता ढोबळेंनी ही अजित पवार यांच्या वर पलटवार केला आहे.

ढोबळे यांनी पवारांच्या या टीकेला जोरदार प्रतीउत्तर दिले. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला लावू नका,’ असे म्हणत पवारांना लक्ष केले. ‘अजितदादा मी माझ्याच पक्षाचा झेंडा घेऊन नाचलो आहे,’ असे देखील ढोबळे यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ढोबळे यांनी पवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘धरणाचं पाणी खारट करतात, हे माहितच होतं. पण जनमानसात चार गोष्टी बोलून माणसं दुखावणं, हा त्यांचा जुना छंद आहे. अशा बोलण्यामुळे पक्षाचं वाटोळं झालं, शरद पवारांचं वाटोळं झालं, पक्ष उद्ध्वस्त झाला. अजूनही अजित पवारांमध्ये सुधारणा झालेली दिसत नाही, असे म्हणाले.

दरम्यान, ‘हलगीच्या तालावर झिंगाट झालेल्या नाच्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. सारखे-सारखे कुंकू बदलणारे तुमच्याशी प्रामाणिक काय राहणार अशी टीका पवार यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर केली होती.

litsbros

Comment here