करमाळा

राष्ट्रीय बालिका दिनी राजुरीच्या शाळेत तृप्ती साखरे यांनी केले विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप


केतूर ( राजाराम माने ) : भारतामध्ये National Girl Child Day म्हणजेच राष्ट्रीय बालिका दिन हा दरवर्षी २४ जानेवारी दिवशी साजरा केला जातो. २००८ पासून केंद्र सरकारने देशभरात मुलींचं अस्तित्त्व जपण्यासाठी आणि मुलीच्या जन्माबाबत समाजात सुरक्षित, आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी खास उपाययोजना करायला सुरूवात झाली आहे.

आज २१ व्या शतकामध्येही भारतात मुलीचा जन्म होणं ही गोष्ट अनेकांना नकोशी वाटते. देशाच्या अनेक भागात मुलीचा जन्म टाळण्यासाठी गर्भपात करण्यापासून ते अगदी नवजात चिमुकल्यांना बेवारस सोडल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मात्र समजातील हाच विचार टाळण्यासाठी सरकारकडून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ हा नारा दिला जात आहे. त्यासाठी तळागाळात पोहचण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. 

जाहिरात

याच बालिका दिनाचं औचित्य साधत आज २४ जानेवारी रोजी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष तृप्ती साखरे-सरोदे यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजुरी(ता.करमाळा )येथे राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून इयत्ता पहिली दुसरीच्या मुलींसोबत खाऊवाटप करून साजरा केला. तसेच मुलांची शैक्षणिक गुणवत्ता पाहून मुलांचं तसेच शिक्षक वर्गाचे कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक मोरे व शिक्षक वर्ग उपस्थित होते. 

हेही वाचा; 

♦ उमरड; ऊस घेऊन जाताना ऊसाच्या ट्रक खाली सापडून ट्रक मालकाचा मृत्यू

♦ ब्रेकिंग न्यूज; ‘या’ कारणामुळे आदिनाथ कारखान्याच्या कामगाराने केली आत्महत्या, 22 तास उलटले तरी मृतदेह कुटीर रुग्णालयातच

♦ करमाळयाची केळी जाते रशियाला, पण आता जळगावनंतर ‘सोलापुरात’ होणार केळीचे क्लस्टर

litsbros

Comment here