Uncategorized

यावर्षी गावरान आंब्याचा “सुवास” दरवळलाच नाही

यावर्षी गावरान आंब्याचा “सुवास” दरवळलाच नाही

 

केतूर (राजाराम माने): आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्यावर गावरान आंब्याची आवक सुरू होते परंतु,गतवर्षी वारंवार बदलणाऱ्या लहरी हवामानामुळे तसेच कमी प्रमाणात पडलेल्या थंडीमुळे गावरान आंब्याच्या झाडांना कमी प्रमाणात आलेला मोहोर या सर्वांचा फटका आंब्याला बसल्याने किरकोळ बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर दिसणारा गावरान आंबा बाजारात मात्र दिसेनासा झाला आहे.

त्यामुळे गावरान आंब्याचा दरवळणारा सुवास यावेळेस गायब झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी या हंगामात बाजारात गावरान आंबा दाखल होत असतो परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणावर वातावरण बदलाचा फटका आंब्यालाअपेक्षित मोहोर आलाच नाही त्यामुळे फळधारणा झाली नाही.त्यातच मध्यंतरी झालेल्या वादळी वाऱ्याने आहे या झाडून पडून नुकसान झाले. त्यामुळे या हंगामात नागरिकांना मात्र गावरान आंब्याच्या सुवासाला मुकावे लागले आहे.

“दरवर्षी मे च्या शेवटच्या आठवड्यात गावरान आंब्याची आवक होते. गावरान आंब्याला घरगुती ग्राहकांकडून मोठी मागणी असते परंतु, यावर्षी गावरान आंबा अतिशय अल्प प्रमाणात बाजारात आला होता”

–अजित शेख,व्यापारी केतूर.

litsbros

Comment here