देश/विदेश

म्हणून पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांना झाली ‘फाशीची शिक्षा’

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांना देशद्रोह केल्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तान येथील विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. 3 नोव्हेंबर 2007 रोजी आणीबाणी घोषित करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांच्याविरोधातील याचिकेवरील सुनावणी विशेष न्यायालयाने 19 नोव्हेंबरला पूर्ण केली होती.

इम्रान खान सरकारने मुशर्रफ यांच्यावरील हा निकाल रोखण्याबाबत याचिका दाखल केली होती. मुशर्रफ यांच्यावरील देशद्रोहाचा हा खटला नवाज शरीफ यांच्या ‘पीएमएल-एन’ सरकारच्या काळात म्हणजे डिसेंबर 2013 मध्ये सुरू झाला.

⚫ ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, जनतेतून सरपंच निवड बंद होणार

⚫  ब्रेकिंग न्यूज; करमाळयाच्या सामान्य परिवारातील प्रशांत जगतापची ‘महाराष्ट्र केसरी’ साठी निवड

सरकारी पक्षाने मुशर्रफ यांच्यावरील सर्व पुरावे विशेष न्यायालयात सादर केले होते. ही सुनावणी आता पूर्ण झाली असून दुबईत राहणाऱ्या मुशर्रफ यांना पाकिस्तान येथील विशेष न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

litsbros

Comment here