आरोग्यमाढा

माढा- ‘वडिलांचे निधन झालेय; मात्र अंत्ययात्रेला येऊ नका, असाल तिथेच प्रार्थना करा!` मुलाविना अंत्यसंस्कार, सर्वत्र हळहळ

माढा; बादलेवाडी ता. माढा: येथील दादा सरक (वय 70) यांचे निधन झाले. त्याचा निरोप सोशल मिडीया व दूरध्वनीवरुन आप्तस्वकीयांना देण्यात आला. मात्र हा निरोप देतांना “वडिलांचे निधन झाले आहे. मात्र अंत्ययात्रा, रक्षा विसर्जनासाठी येऊ नका. असाल तिथेच प्रार्थना करा’ असा संदेश देण्यात आला. कुटुंबातील मोजक्‍या व्यक्तींनी अंत्यसंस्कार केले. तेसुद्धा प्रत्येकाला सॅनीटायझर वारंवार हात स्वच्छ करुन. परिसरातील सगळ्यांसाठी “लॉकडाऊन’च्या काळात घालून दिलेला हा एक आदर्श ठरला आहे.

श्रीहरी दादा सरक यांचे वडिल बादलेवाडी गावातील रहिवासी गणेश सरक यांच्या वडिलांचे 26मार्च रोजी पहाटे राहत्या घरी निधन झाले. गावात परिचीत कुटुंब असल्याने अंत्ययात्रेला मोठी गर्दी अपेक्षीत होती. मात्र प्रशासन, पोलिस अथवा इतरांनी काही सूचना करण्याआधी त्यांनी स्वतःच वेगळा निर्णय घेतला. कुटुंबातील सदस्यांतच अंत्यसंस्कार केले.
Advertising

लग्न आणि अंत्ययात्रेला आवर्जुन उपस्थित राहण्याचा सामाजिक प्रघात आहे. मात्र “कोरोना’ने हे प्रघातही मोडीत काढले आहेत. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे मंगल कार्यालये बंद आहेत. विवाहाचे मुहुर्त पुढे ढकलण्यात आले आहे.

हेही वाचा- सांगोला तालुक्यातील ‘त्या’ दोन कोरोना संशयितांची सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती

सोलापुरात ‘इतक्या’ दराने मटन विक्री; दुकानासमोर लागल्या रांगा

Advertise

अंत्यसंस्कारावरही त्याचे परिणाम दिसून आले आहेत. सरक यांच्या निधनाची माहिती समजल्यावर “कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अत्यंविधी मोजक्‍याच उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला. आप्त, स्वकीयांना सोशल मिडीया, तसेच दुरध्वनीवकरुन माहिती देण्यात आली. मात्र त्यात “वडिलांचे निधन झाले आहे.

मात्र अंत्यविधी, रक्षाविसर्जनासाठी येऊ नका. असाल तीथेच प्रार्थना करा.’ या प्रघाताहून वेगळ्या निरोपामुळे तो चर्चा, परिसरासाठी आदर्श ठरला. अत्यंविधीसाठी उपस्थित कुटुंबातील सदस्यांनीही आपल्याबरोबरच इतरांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क, रुमाल बांधला होता.

प्रत्येकाच्या हातावर वारंवार सॅनिटायझर टाकून दोन व्यक्तीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून अत्यंविधी झाला. विशेष म्हणजे मोठा मुलगा मुंबई वरून गावाजवळ येत असुनही मुला विना अत्यंसंस्कार केल्याने पंचक्रोशीतील नागरिकांत मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Advertising 4

करमाळा शहरात स्वच्छतेपासून इतर सर्व कामे करणाऱ्या नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Zaterdag 28 maart 2020

litsbros

Comment here