ताज्या घडामोडीदेश/विदेशमनोरंजनमहाराष्ट्रसांस्कृतिक

महाराष्ट्रात छम छम पुन्हा सुरू होणार, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

महाराष्ट्रातील डान्सबार संदर्भातील जाचक, अटींवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मुंबई, 17 जानेवारी : मुंबईसह इतर शहरात डान्सबारमधली छमछम आता पुन्हा सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.
महाराष्ट्रातील डान्सबार संदर्भातील जाचक, अटींवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी 2005 मध्ये डान्सबारवर बंदी आणली होती.

डान्सबार बंदीचा आजवरचा घटनाक्रम

– 2013 : सुप्रीम कोर्टानं सरकारची बंदीची याचिका फेटाळून लावली
– 2013 : बारमध्ये काम करणार्‌या महिलांना त्यांचा व्यवसाय करण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला
– 2014 मध्ये डान्स बार बंदीच्या कायद्यात सरकारनं दुरुस्ती केली
– 2015 : पण सुप्रीम कोर्टानं या बंदीच्या दुरुस्तीला स्थगिती दिली
– 2015 : डान्स बार बंदीच्या नियमनाचे अधिकार सरकारकडे, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
– 2016 : डान्सबारला 2 दिवसांत परवाने द्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश
– 2016 : मुंबईत 10 वर्षांनंतर 6 डान्स बार होणार सुरू
– 2019 : सुप्रीम कोर्टाने डान्स बार सुरू करण्यास परवानगी

litsbros

Comment here