ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमाढाराजकारण

फलटणचे संतोष बिचुकले माढा लोकसभेचे अपक्ष उमेदवार : ओबीसी आरक्षणासाठी हायकोर्टात लढले

(करमाळा माढा न्युज) : माढा लोकसभा निवडणुकीत बरेच अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत , त्यातीलच एक म्हणजे फलटणचे धनगर आरक्षणाचे लढाऊ युवा नेतृत्व सचिन बिचकूले. बिचकूले यांना निवडणूक चिन्ह म्हणून ‘हेलिकॉप्टर’ हे चिन्ह मिळाले आहे.

बिचकूले यांनी 2016 साली विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात लक्षवेधी लढत दिली होती, तेव्हा पासून ते चर्चेत आले. आता ते लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना शह देण्यासाठी उभे आहेत. हे ही एकेकाळी राष्ट्रीय समाज पक्षात महादेव जानकर यांचे कट्टर समर्थक होते. बिचकूले हे ओबीसी कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात, ओबीसी आरक्षणा विरोधात याचिका दाखल झाल्यावर त्याविरुद्ध बिचुकले यांनी हायकोर्टात दाद मागता ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी लढा दिला. त्या बिचुकलेंना आता माढा लोकसभा मतदारसंघात जनता किती स्वीकारते हे पाहूया.

litsbros

Comment here