करमाळाशेती - व्यापार

परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान, पण जनावरांना चारा मुबलक प्रमाणात झाला उपलब्ध

केतूर ( राजाराम माने ) संपूर्ण करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात माळरानावर पडिक जमिनीत सर्वदूर पाऊस बरसात करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर हिरवेगार गवत विपुल प्रमाणात आल्याने हे गवत खाण्यासाठी जनावरे गर्दी करत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे सध्यातरी जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे.

मागील दोन वर्षापासून संपूर्ण करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागला होता.या उन्हाळ्यात बागायत समजल्या जाणाऱ्या भागालाही दुष्काळाचा सामना करावा लागला होता.त्यामुळे झाडे जळून त्याचा खराटा झाला होता तर पालापाचोळा गवतही नाहीसे झाले होते.परिणामी पाळीव व मोकाट जनावरांचा चारा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

यावर्षीही पावसाचे चार महिने पावसाने ठेंगाच दाखविल्याने जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर होत होता,मात्र ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने चांगलेच मनावर घेतल्याने कधी रिपरिप,रिमझिम तर कधी मुसळधार बरसात केल्याने व सध्या ही बरसात सप्टेंबर महिना सुरू झाला तरी सुरूच असल्याने जागोजागी माळरानावर,पडीक जमिनीवर,मोकळ्या जागेवर हिरवेगार गवत उगवल्याने या गवतावर जनावरे यथेच्छ ताव मारताना दिसत आहेत.

litsbros

Comment here