धार्मिकपंढरपूर

पंढरपूर येथे मोफत राज्यस्तरीय मराठा वधु-वर मेळाव्याचे आयोजन; जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी सहभागी होण्याचे आवाहन

करमाळा माढा न्यूज;  बुलडाणा शहरात सुरू झालेली महाराष्ट्र मराठा सोयरिकीची विनाशुल्क वधू वर परिचय मेळाव्याची लोक चळवळ ही सम्पूर्ण राज्यात लोकप्रिय ठरली असून राज्यात लोक सहभागातून मेळाव्याची शृंखला सुरू असून नुकताच महाराष्ट्र मराठा सोयरीकचा 25वा विनाशुल्क राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा 29 डिसेंम्बरला मोठ्या थाटात शनी शिंगणापूरला पार पडला, त्याच धर्तीवर महाराष्ट्र मराठा सोयरिकचा 26 वा राज्यस्तरीय मेळावा 2 फेबुरवारीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मेळावा होणार आहे.

या मेळाव्याचे नियोजन सुरू झालेले असून स्थानिक समाज बांधवांच्या सहकार्यातून जययत तयारी मेळाव्याची सुरू आहे, मेळाव्यामध्ये पाल्य व पालक यांना भोजन व्यवस्थाही विनामूल्य ठेवण्यात आलेली आहे,संपूर्ण भारताच्या विविध प्रांतामध्ये पसरलेल्या मराठा समाजाला आपल्या उपवर वधू वराच्या सोईरीकीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मराठा समाजाचे संघटन एकत्रित करण्याचे कार्य महाराष्ट्र मराठा सोयरीक संघाच्या माध्यमातून अविरत सुरू आहे.

हेही वाचा; करमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने ‘पोलिस रेझिंग डे’ निमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न, अजिनाथ गाढवे प्रथम

जवंजाळ यांच्या पुढाकाराने पंढरपूर मराठा सोयरीक वधू-वर परिचय मेळावा नियोजन समितीच्या वतीने आयोजित मराठा समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे रविवार दि.2 फेबुरवारी 2020 रोजी तीर्थक्षेत्र पंढरपूर जि सोलापूर येथे संत जगतगुरू तुकाराम महाराज मंगल कार्यालय ,जुना अकलूज रोड,सांगोला पाणीपुरवठाशेजारी, इसबावी पंढरपूर येथे मराठा समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे सकाळी 9 ते दुपारी 5 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून मराठा सोयरिक संघ शाखा पंढरपूर समिती मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहे. समाजातील अनिष्ट चालीरीती, बोकाळलेल्या विवाह संस्था, विवाह जोडणीत निर्माण झालेले दलाल या सर्वांना आळा बसवण्याचा हा अल्पसा प्रयत्न मराठा सोयरिक संघाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर सुरू आहे. या प्रयत्नातून दलालांना व फसवणूक करणाऱ्या विवाह संस्थांना जरब बसवण्यात महाराष्ट्र मराठा सोयरीक संघाला बरेचसे यशही मिळालेले आहे.

हेही वाचा; करमाळा माढा न्यूजच्या बातमीचा इफेक्ट- 15 दिवसापासून बंद असलेली वीट मार्गे जाणारी ‘करमाळा-वाशिंबे एसटी’ बातमीनंतर एका दिवसात सुरू

पालकांच्या अवाजवी उंच अपेक्षेमुळे फार मोठी विषमता आज समाजात निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नाच्या मुली मिळेनाश्या झाल्या आहेत. शिवाय मधल्या काळात मुलींचा जन्म दर कमी झाल्याने राज्यात प्रत्येक खेड्यात 50 च्या वर मुले आहेत की ज्यांच लग्नच जुळेल की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही भयानक विषमता दूर करणेसाठी महाराष्ट्र मराठा सोयरिकचे मेळाव्याच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे विवाह व हाच महत्त्वाचा टप्पा जवंजाळ पाटील यांनी सोशल मीडियाचा आधार घेऊन संबंध महाराष्ट्रभर मराठा सोयरिक संघाच्या माध्यमातून विवाहपीठ म्हणुन वधू-वरांसाठी निर्माण केले.

हेही वाचा; करमाळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ‘निष्ठा’ प्रशिक्षण केंद्राला जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिली भेट

विवाह जमविणे जेवढे जिकरीचे तेवढेच महत्वाचे कार्य आहे, हे एक सामाजिक व सेवाभावी काम असून त्याच वृत्तीने ते केले तरच खरा आनंद व समाधान मिळते. याच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून रविवार दि. 2 फेबुरवारी 2020 रोजी पंढरपूर येथे संपन्न होणारा भोजन व्यवस्थेसह विनाशुल्क मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा हा राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी मेळावा ठरणार आहे आहे.

पंढरपूर येथे घेण्यात येणाऱ्या विनाशुल्क थेठभेट वधू-वर परिचय मेळाव्यास सम्पूर्ण महाराष्ट्रातील वधू-वरांनी, पालकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र मराठा सोयरीक चे संस्थापक अध्यक्ष सुनीलराव जवंजाळ बुलडाणा यांनी केले आहे.

हेही वाचा; उपमुख्यमंत्री अजितदादांचे बारामतीकर करणार जंगी स्वागत, 10 जानेवारी रोजी सत्काराचे आयोजन

litsbros

Comment here