करमाळाताज्या घडामोडीपंढरपूर

पंढरपुर येथे कनिष्ठ अभियंत्याला मारहाण

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा कनिष्ठ अभियंता इस्माईल बाबुमिया मुलाणी‌ यांना पंढरपूर येथील बांधकाम व्यावसायिक ठेकेदार पवार यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या झालेल्या घटनेचा काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शाखा अभियंता कन्हेरे एम के, शाखा अभियंता आर के शेख, कनिष्ठ अभियंता बी व्ही रेपाळ , कनिष्ठ अभियंता बी एच गायकवाड, शाखा अभियंता जि एस पाटील यांनी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करुन प्रतिक्रिया दिल्या.

आम्ही शासनाचे नोकर असुन कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं, जर ठेकेदारने तसेच इतर मंडळींनी सुध्दा जाणिव ठेऊन आमचा विचार करावा. जर आश्या न शोभणार्य घटना घडत राहिल्या तर लोकशाहीला घातक आहेत आपला देश हा शेती प्रधान देश आहे लोकशाहीच्या मार्गाने चालणारा देश आहे जर अश्या घटना घडत राहिल्या तर आम्हाला सुध्दा संघटनेच्या माध्यमातून ठोस पावले उचलावी लागतील. अश्या तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते.

litsbros

Comment here