करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

दुधाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार- करमाळा रासप

दुध दर वाढीबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

जेउर (प्रतिनिधी); शासनाने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करावे, अन्यथा आंदोलन. करू असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. दिवसेंदिवस दुधाचे दर कमी होत असल्यामुळे दुधाचे दर वाढवण्यात आले पाहिजेत यासाठी करमाळा तहसीलदार समीर माने यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष अंगद देवकते, युवा जिल्हा अध्यक्ष नितिन पारेकर, नेते अध्यक्ष बाळासाहेब टकले, जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील, ता.सरचिटणीस शंकर सुळ, तानसेन खांडेकर,अजित पारेकर,बाळासो पारेकर आदी रासप कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवेदना प्रसंगी बोलताना रासप अध्यक्ष अंगद देवकते म्हणाले की, दुधाच्या किमती कमी झाल्याने बळीराजा निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आहे. शेतकऱ्याला शेती उत्पादनाबरोबर दुधाचा धंदा उपयोगाचा असतो, परंतु, 20 रुपये दरामुळे शेतकरी कोलमडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शासनाने दहा रुपये अनुदान त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करावे, असे शासनाने न केल्यास राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रासप च्या वतीने दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाअधिकारी साहेब यांना ईमेलद्वारे प्रती पाठविलेल्या आहेत. या निवेदनात म्हटले आहे की,करमाळा तालुक्यात70 हजारांपेक्षा जास्त पशुधन आहे.अनेक कुटुंबाचा शेती निगडीत दुध व्यावसायावर उदरनिर्वाह चालू आहे.गेली तीन महिन्यापूर्वी दुधाचा दर प्रति लीटर 30ते 40रूपये होता आणि दुध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान जमा होत होते.

मात्र खाजगी दुध संघाच्या मनमानी कारभारामुळे व सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.अनेक शेतकर्यांनी उसनवारी करून,खाजगी कर्ज काढून गायी व म्हशी घेतलेली आहेत.

जनावरांच्या खुराखाचे दर दुधाच्या दरापेक्षा जास्त आहे.दुध संस्थां 20ते25रूपये प्रति लीटर दर देतात आणि अनुदान लाटतात.घसरलेल्या दुधाचे दर पूर्ववत करून दुध उत्पादकांच्या बॅंक खात्यावर दहा रूपये अनुदान शासनाने त्वरित जमा करावे अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने वेळप्रसंगी शेतकर्यांसाठी रस्त्यावर उतरणार असा इशारा तालुका अध्यक्ष अंगद देवकते यांनी दिलेला आहे.

आमदार प्रणिती शिंदे Live

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Donderdag 28 mei 2020

https://www.instagram.com/p/CAiC-JsAwOM/?igshid=s4rg16f4xmz

#लाईव्ह आहेत, श्रीमती.#वीणा_पवार मॅडम ( #मुख्याधिकारी #करमाळा #नगरपरिषद) Live आहेत. कमेंट करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहराविषयी बोला- संवाद साधा.

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Vrijdag 22 mei 2020

https://www.instagram.com/p/CAICbPUAWXB/?igshid=1lxrjmawsph5f

https://www.facebook.com/karmalaNewsLive/videos/1673315989475952/

#Facebook_Liveकु.पुजा झोळे, युवा नेतृत्वविषय- छत्रपती शिवाजी महाराज व आजचा महाराष्ट्र

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 20 mei 2020

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Dinsdag 19 mei 2020

निरागस बालके अन बोबडे बोल

#किती_गोड_किती_निरागसमराठीतील तुफान गाजलेले 'प्रीतीत ये ना, जवळ घे ना', हे गाणे आपल्या बोबड्या बोलांनी गाणारे दोघे चिमुरडे. नक्की ऐका, खूप सुंदर आहे. #ViralVideo

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 27 mei 2020

करमाळाकरांचा फेसबुक ग्रुप नक्की जॉईन करा
👇👇
*https://www.facebook.com/groups/1149136831854561/?ref=share*

litsbros

Comment here