करमाळाकेमकोर्टीताज्या घडामोडीपांडेमहाराष्ट्ररोजगारवांगीवीटसोलापूर जिल्हा

चिखलठाण : अमोल पवार यांची ‘जिल्हा महिला व बालविकास अधिकारी’ पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा माढा न्यूज : चिखलठाण गावचे सुपुत्र अमोल किसन पवार यांची जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पदी निवड झाली आहे. आयोगाच्या परीक्षेत पवार यांनी महाराष्ट्रात 3 रा क्रमांक मिळवला आहे, त्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

पवार हे 2010 साली प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद सांगली येथे रुजू झाले होते. तर 2011 साली त्यांची निवड तलाठी या पदावर झाली होती.
लगेच 2012 साली स्पर्धा परीक्षा द्वारे त्यांची निवड ‘वरिष्ठ साहाय्यक गोदावरी पाटबंधारे विभाग’ येथे झाली होती. तर 2015 साली त्यांची निवड ‘राज्यकर निरीक्षक मुंबई’ या पदावर झाली होती. असे सतत स्पर्धा परीक्षेत यश मिळत त्यांनी आपली गुणवत्ता वेळोवेळी सिद्ध केली आहे . आता त्यांची निवड “जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पदी” झाल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

व्हिडीओ बातम्यांसाठी लगेच सबस्क्राईब करा करमाळा माढा न्यूज चे युट्यूब चॅनेल 👇

पवार यांची जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल चिखलठाण येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कल्याण गव्हाणे, स्वप्नील बोराडे, रोहित पोळ,वैभव खवले,हनुमंत बोराडे, विपुल विभुते, दत्ता वाघे व मित्र परिवार उपस्थित होता.

litsbros

Comment here