आम्ही साहित्यिकआरोग्यकरमाळा

कोरोना परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व- प्रा.डॉ.दिपक सुरवसे यांचा अभ्यासपूर्ण लेख

कोरोना परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व –

आंतरराष्ट्रीय स्तरावर; तसेच देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत.महाराष्ट्रात सर्व प्रथम पुणे शहरात कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यात हा कायदा लागू करत असतात. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक ; तर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांची सनियंत्रक म्हणून नियुक्ती केली जाते.
देशात पहिल्यांदाच आरोग्याबाबत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवरआपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय याबाबत थोडे जाणून घेऊ या.

आपत्ती म्हणजे

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी किंवा अन्य प्रकारची हानी संभवते. बाहेरील मदीतीची आवश्यकता भासण्याइतपत तीव्रता असणारी बाब म्हणजे आपत्ती.

 राष्ट्रीय आपत्ती

कोरोना अर्थात ‘कोविड-१९’ या विषाणूच्या साथीला केंद्र सरकारने आज राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले. मोठ्या प्रमाणावर प्राणहानीस कारणीभूत ठरणारे महापूर, वादळ,देशावरील परकीय आक्रमण किंवा कोणत्याही भयंकर दुर्घटनेच्या वेळी राष्ट्रीय आपत्ती घोषित केली जाते. ‘आपत्ती’ हा शब्द मुख्यतः नैसर्गिक संकटाबरोबर जोडलेला असला तरी साऱ्या देशभराला विळखा घालणाऱ्या संकटावेळीही राष्ट्रीय आपत्तीची घोषणा करण्यात येते. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार नैसर्गिक संटकांबरोबरच अण्विक, जैविक किंवा रासायनिक या मानवरहित संकटांच्या वेळीही राष्ट्रीय आपत्तीची घोषणा होते. ही परिस्थिती कोणत्या वेळी घोषित करावी याचे ठराविक निकष नसतात. मात्र संकटाचे स्वरूप देशव्यापी व उग्र असेल तर केंद्राला तसे अधिकार मिळाले आहेत. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय आपत्ती कोषाच्या (एनडीआरएफ) माध्यमातून राज्यांना विशेष आर्थिक सहाय्य तत्काळ पाठविले जाते. खर्चात केंद्राचा ७५ टक्के, तर राज्याचा २५ टक्के वाटा असतो. ही मदत एखाद्या राज्यापुरती पुरी आहे, असे जाणवले तर केंद्र सरकार १०० टक्के अर्थसाह्य देते . कोणत्याही प्रकारची आपत्ती लागू करताना राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरीय समितीचे प्रमुख आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतात. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान, राज्यपातळीवर मुख्यमंत्री, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी हा निर्णय घेतात.

कोरोनाचा पंढरपूर सह अकलूजमध्ये शिरकाव; बापरे! सोलापुरात आज बुधवारी 43 नवे बाधित तर 3 जणांचा मृत्यू, एकूण मृत्यु 66

रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय; असे होणार गुणदान, वाचा क्लिक करुन

प्रसिद्ध व्याख्याते व कवी जगदीश ओहोळ यांची कोरोनाच्या सद्यस्थितीवर आधारित जबरदस्त कविता ‘कोविड’ व पहा ‘लॉकडाऊन मधल्या लाख मोलाच्या गोष्टी’

आपत्ती व्यवस्थापन
नैसर्गिक आपत्ती(Natural Calamities) मानव संसाधन (Human Resources), राष्ट्रीय संपत्ती( National Wealth),आणि अर्थव्यवस्था (Economy) संबधिक कोणतीही आपत्ती आल्यानंतर अथवा आपत्ती येऊ नये म्हणून केलेली कार्यवाही म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीपूर्व काळासंबंधी आपत्ती प्रतिबंध यंत्रणा किंवा पूर्वतयारी तसेच नियोजन, संघटन, समन्वय व कार्यप्रणाली यांची योग्य अंमलबजावणी महत्वाची असते.

आपत्ती व्यवस्थापन कायदा
भारतात १९९३ साली ओरिसा (ओडिशा)च्या चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने एक समिती स्थापन करून धोक्यांचा आणि त्यापासून उद्भवणाऱ्या आपत्तींचा सर्वंकष अभ्यास केला. तसेच भारताने आपत्तिदरम्यान मदतकार्यासाठी व्यवस्थापनातील सगळे विभाग, शास्त्रीय संशोधनातील संस्था, शिक्षण संस्था आणि सामान्य जनसमुदाय तसेच बचावकार्य करणाऱ्या संस्था यांच्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा बनवण्याची निकड कळून चुकली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) हा संसदेत २५ डिसेंबर २००५ साली पारीत झाला. आपत्ती व्यवस्थापनाचे धोरण आणि आराखडा तयार करण्याची तरुतूद कायद्यात आहे

भारतात आपत्ती व्यवस्थापनामध्ये खालील 4 समिती/संस्था महत्वाची भूमिका पार पाडतात.

1. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण(NDMA)- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती तयार केली जाते ज्याचे कायमस्वरुपी अध्यक्ष पंतप्रधान असतात. पंतप्रधान 9 तज्ज्ञांची नेमणूक करतात येणाऱ्या आपत्तींबाबत माहीत देतात. राज्यस्तरावर या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात.

2. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM)- राज्यस्तरीय प्रशिक्षक तयार करण्याचे काम ही संस्था करते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या गाईडलाईननुसार ही संस्था आपत्ती व्यपस्थापनची सर्व प्रशिक्षण देते.

3. राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल(NDRF) – राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल उभारण्यात आल्या असून आपत्ती नंतरच्या काळात काम करतो. केंद्रशासनार्गंत निमलष्करी दल म्हणजे सीमा सुरक्षा दल( BSF) आणि इंडो-तिबेट सीमा पोलिस (ITBP) सारखे दल आपत्ती व्यवस्थापनासाठी पाठविल्या जातात. त्यांच्याकडे उपलब्ध असलेले आधुनिक संसाधनाचा वापर करुन आपत्ती निवारणाचे काम हे दल करतात. पुर, त्सुनामी, भुंकप कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास निमलष्करी दल आपत्ती निवारण करते.

4. राज्य स्तरावर तत्सम दल (SDRF) – राज्य स्तरावर तत्सम दल उभाण्यात आली असून मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापनामध्ये मुख्य सचिव(Chief Secretary) यांच्या खालोखल सर्व विभाग प्रमुख असतात. आपत्ती आल्यानंतर राज्य स्तरावर तत्सम दलाने दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्याचे काम हे अधिकारी करतात. राज्यशासनाने अथवा केंद्रशासनाने घेतलेला निर्णय अतिमपातळीपर्यंत पोहचवून अंमलबजावणी करण्याचे काम हे अधिकारी करतात. आपत्ती आल्यानंतर या सर्व विभागांच समन्वय साधण्याचे काम राज्य स्तरावर तत्सम दल विभागामार्फत केले जाते.

 आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर अधिकाऱ्यांना मिळणारे अधिकार
– आवश्‍यकता भासल्यास खासगी जागा, वाहणे, सेवा, वस्तू अधिग्रहित करण्याचा अधिकार. उदा. हॉस्पिटल, डॉक्टर, अॅब्युलन्स
– आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारा निधी उभा करणे.
– आपत्ती बाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करणे.
– आपत्ती व्यवस्थापनसाठी लागणारी मानवी संसाधन( Man Power) उभारणे.

 आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर अधिकाऱ्यांवरील जबाबदारी
– आपत्ती बाबत जनजागृती करणे
– आपत्ती बाबत गोंधळाची निर्माण होऊ नये यासाठी दक्ष राहणे.
– आपत्तकालिन मदत आणि सेवा लोकांपर्यंत पोहचवणे.
– आपत्ती निवारणासाठी धोरण आखणे आणि अंमलबजावणी करण
– आत्यवशक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणे.

 कोरोना परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व-

1. खासगी डॉक्टरांची सेवा व साहित्याचे अधिग्रहण
या कायद्यान्वये खासगी डॉक्टरांची सेवासह हॉस्पिटलमधील साधनसामग्री अधिग्रहीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांनी सीएस व डीएचओंना दिले आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कलम ५१ अन्वये कारवार्ई होईल. खासगी रुग्णालये सहकार्य करीत नसल्यास त्यांचेवर योग्य ती कारवाई करावी व जिल्ह्यातील विविध रुग्णालये व हॉस्पिटल यांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत.

2. टोल फ्री क्रमांक १०४ कार्यान्वित
यासंबंधाने टोल फ्री क्रमांक १०४ कार्यान्वित करण्यात यावा व खात्री करावी तसेच राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाच्या ०२०-१६१२७३९४ व राष्ट्रीय कॉल सेंटरच्या ९१-११-२३९७८०४६ या क्रमांकाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे निर्देश सीएस व डीएचओंना देण्यात आले. विमानतळावरची माहिती आरोग्य विभागाला प्राप्त होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन निरीक्षणाखाली ठेवावे व याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश आहेत.

3. समाज माध्यमांवर अफवा; सायबर सेलद्वारे कारवाई समाज माध्यमांवर कोरोनाबाबत अफवा, गैरसमज पसरविणाºयांवर आता सायबर सेलमार्फत कारवाई केली जाईल. या अफवांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश सीपी व एसपी यांना देण्यात आले. याशिवाय औद्योगिक सुरक्षा बल संचालक, आरोग्य संचालक, शिक्षणाधिकारी, रेड क्रॉस, लायन्स क्लब, रोटरी क्लब, विपश्यना केंद्र व्यवस्थापक व सेवाभावी संस्था यांनाही जागृती व प्रशासनासोबत समन्वयाच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.

लेखक-  प्रा.डॉ. दिपक कुंडलीक सुरवसे

(आप्पासाहेब जेधे महाविद्यालय पुणे) 8087217999

#Facebook_Liveकु.पुजा झोळे, युवा नेतृत्वविषय- छत्रपती शिवाजी महाराज व आजचा महाराष्ट्र

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 20 mei 2020

https://www.instagram.com/p/CAS2OhiAQlQ/?igshid=3h6okmll0hdz

करमाळा माढा न्यूज व्हाट्सप – 9067564080 संपर्क – 7058592990

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Dinsdag 12 mei 2020

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Donderdag 7 mei 2020

विठ्ठल रुक्मिणीस रत्नागिरीच्या हापूस आंबा व पानांची मनमोहक आरास

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Zondag 10 mei 2020

जॉईन करा ‘करमाळा माढा न्यूज’ टेलिग्राम चॅनेल
👇👇👇👇👇👇
Karmala Madha News
https://t.me/karamalamadhanews24

https://t.me/karamalamadhanews24/6

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Maandag 11 mei 2020

https://www.facebook.com/176339512928595/posts/650244742204734/

litsbros

Comment here