आरोग्यकरमाळा

केम येथे दिनांक 22 ते 24 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू; ग्रामपंचायत घेतेय काळजी

 जेऊर प्रतिनिधी। सोलापूर येथे कोरोना विषाणू रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुले त्याचा प्रसार आपल्या गावात होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून केम येथे दि २२ते २४ पर्यत जनता कर्फ्यु केम ग्रामपंचायतीचे वतीने जाहिर केली आहे. याला केम येथील जनतेने शंभर टब्के प्रतिसाद दिला.

गावात दवाखाने व मेडिकल दुकाने वगलता सर्व व्यवहार ठप्प झालेले दिसले. पेट्रोल पंप ही बंद होता. सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. ग्रामपंचायतीने जनतेची योग्य ती काळजी घेतलेली आहे. गावातील शिवसभो वेशीमध्ये साँनिटाझर मशिनचे साहयाने नागरिकावर फवारणी करून त्याना प्रवेश दिला जात आहे.

तसेच गावात येणारे सर्व रस्ते सील केले आहे. हे काम स्वयंसेवक करीत आहेत .बाहेर गावाहून येणान्या नागरिकावर करडी नजर ठेवली जात आहे. याची नोंद ग्रामपंचायती मध्ये केली जात आहे.

हेही वाचा- सोलापुरात आज बुधवारी सापडले कोरोनाचे नवे 3 रुग्ण; एकूण संख्या 33

सोलापूरला 6 महिन्यात 3 पालकमंत्री; ना.दत्तामामा भरणे यांची सोलापूरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती

यासाठी ग्रामसेवक नवनाथ सातव सरपंच आकाश भोसले माजी सरपंच आकाश भोसले ऊपसरपंच नागनाथ तलेकर सदस्य राहुल कोरे तसेच स्वयसेंवक ग्रामपंचायतीचे कर्मचारी हे आहो रात्र परिश्रम घेत आहे कोरोनाला हरविण्यासाठि घरीच थांबा व सहकार्य करा असे आवाहान ग्रामपंचायतीचे वतीने करण्यात आले.

litsbros

Comment here